प्लास्टिकमुळे वाढणारे समुद्री प्रदुषण (Ocean Pollution) हा सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. समुद्री प्रदुषण (Sea Pollution) कसे रोखता येईल याबाबत जगभरातील संशोधक प्रयत्नशिल आहेत. प्लॅस्टिक प्रदुषणामुळे समुद्रातील अनेक जीवांना धोका निर्माण होतो. दरम्यान, संशोधकांच्या एका टीमला नुकतेच असे आढळून आले आहे की, समुद्रातील काही जीव हे प्लॅस्टिककडे आकर्षित होत आहेत. होय, हार्मीट खेकडा (Hermit Crab) ज्याला संन्याशी खेकडा म्हणूनही ओळखले जाते. हा खेकडा समुद्रातील प्लॅस्टीकच्या वासाने लैंगिकदृष्ट्या एकमेकांकडे आकर्षित (Hermit Crab Sexually Attracted to Plastic) होतो आहे. ओलेमाईड (Oleamide) नावाचा प्लास्टिकमध्ये असलेले रसायण कोळंबी (Shrimp) माशासह इतर अनेक समुद्री जीवांसाठी लैंगिकदृष्ट्या उत्तेजना वाढवणारे ठरते. प्लॅस्टिकमध्ये असलेले विशिष्ट रसायन या जीवांना आकृष्ट करते.
दरम्यान, हल विद्यापीठातील (University of Hul) एका संशोधकांच्या टिमला आढळून आले आहे की, समुद्रातील संन्याशी खेकडे (हार्मीट खेकडा) जेव्हा या रसायनांच्या सानिध्यात जातात तेव्हा त्या रसायनाच्या वासामुळे या खेकड्यांच्या श्वासोच्छास वाढतो. श्वासोच्छावास वाढल्यानंतर त्यांच्या एकूण वर्तनावरुन निदर्शनास येते की हे खेकडे एकमेकांडे लैंगिकृष्ट्या आकर्शित होतात, असे हे संशोधक सांगतात.
पीएचडी अभ्यासक पाउला शिरमाकर (Paula Schirrmacher) सांगतात की, हे खेकडे Oleamide रसायनामुळे एकमेकांकडे आकर्षित होतात. Oleamide रसायनामध्ये असलेले गुणधर्म या खेकड्यांना आकर्षित करतात. मुळात खेकड्यांमध्येही ही रसायणे असतात. परंतू, लैंगिकदृष्ट्या उत्तेजीत होण्याच्या काळातच ती निर्माण होतात. अनेकदा भुकेलेल्या आणि लैंगिकदृष्ट्या उत्तेजीत झालेल्या खेकड्यांना हे प्लास्टिक अन्न वाटून शकते. हे प्लास्टिक या खेकड्यांनी अन्न म्हणून प्राशन केल्यास या प्रजातीला धोका निर्माण होऊ शकतो, असे अभ्यासक सांगतात.
वाढते समुद्री प्रदुषण हा सर्वांच्याच द्वेशाचा विषय आहे. प्रामुख्याने गेल्या काही काळात तेल, रासायनिक पदार्थांसोबतच वाढत्या प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण मोठे आव्हान ठरते आहे. एखादे कासव, मासा अथवा कोणताही पक्षी, प्राणी प्लास्टीकमध्ये अडकतो आणि मदतीसाठी याचना करतो तेव्हा अनेकांचा जीव कासावीस होतो. मात्र, वास्त परिस्थिती अशी की, IUCN च्या अंदाजानुसार दरवर्षी किमान 7.2 दशलक्ष टन प्लास्टिक आपल्या महासागरांमध्ये टाकले जाते. भविष्यात ही समस्या आणखीनच बिकट होणार आहे.