Heat-Related Deaths: उष्णतेमुळे 2050 पर्यंत होऊ शकतात 5 पट अधिक मृत्यू; 12 कोटी 70 लाख लोक ठरू शकतात उपासमारीचे बळी- Lancet Study
Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

यंदाचे म्हणजेच 2023 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे, ज्यामध्ये 1,00,000 वर्षांहून अधिक काळातील सर्वोच्च जागतिक तापमानाची नोंद झाली आहे. मागच्या वर्षीपासून सर्व खंडांमध्ये उष्णतेचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. आता प्रतिष्ठित मासिक द लॅन्सेट काउंटडाऊन ऑन हेल्थ आणि क्लायमेट चेंजच्या ताज्या आवृत्तीने हवामान बदलामुळे भविष्यात आरोग्यासाठी गंभीर आणि वाढणारा धोका उघड केला आहे. त्यानुसार, जगात शतकाच्या मध्यापर्यंत उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 4.7 पट वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

मंगळवारी प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार या शतकाच्या अखेरीस तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 370 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. लॅन्सेटने हवामान बदलावर आठवा अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, हवामान बदलामुळे आज जगभरातील लोक जीवन आणि उपजीविकेसाठी संघर्ष करत आहेत.

लंडनमधील एका महाविद्यालयात दिलेल्या निवेदनात लॅन्सेट काउंटडाउनचे कार्यकारी संचालक म्हणाले की, तापमानातील वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यांनी सांगितले की, आम्हाला औद्योगिक उत्पादन मर्यादित करावे लागेल. तरीही दर सेकंदाला 1337 टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होतो. आपल्याला कार्बन उत्सर्जन कमी करावे लागेल.

रोमेनेलो यांनी निवेदनात नोंदवले की, मानवनिर्मित हवामान बदलामुळे 1991-2000 च्या तुलनेत 2013-2022 मध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 85% वाढ झाली आहे. जे तापमानात बदल न झाल्यास 38% वाढीपेक्षा खूप जास्त आहे. हवामान बदलामुळे आज जीवन आणि उपजीविकेची हानी कशी होत आहे यावरही या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. 2022 मध्ये, लोकांना सरासरी 86 दिवस आरोग्यास हानीकारक उच्च तापमानाचा सामना करावा लागला. त्यापैकी 60 टक्के हा मानवामुळे झालेल्या हवामान बदलामुळे झाला.

अहवालानुसार, जागतिक स्तरावर उष्णतेच्या प्रदर्शनामुळे संभाव्य कामगार तास 50 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. अधिक वारंवार उष्णतेच्या लाटेमुळे 2041-2060 पर्यंत अंदाजे 525 दशलक्ष अधिक लोक मध्यम ते गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करू शकतात, ज्यामुळे कुपोषणाचा जागतिक धोका वाढतो. 1981 ते 2010 च्या तुलनेत 2021 मध्ये 122 देशांतील 127 दशलक्षाहून अधिक लोकांना अन्नधान्याच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागल्याचा दावाही या विश्लेषणात करण्यात आला आहे. (हेही वाचा: Protecting Yourself from Air Pollution: हवेची गुणवत्ता घसरली? वायू प्रदूषणापासून कसा कराल स्वत:चा बचाव? घ्या जाणून)

अहवालानुसार, बदलत्या हवामानामुळे घातक संसर्गजन्य रोग वेगाने पसरत आहेत. 1982 पासून समुद्राच्या उष्णतेमुळे व्हिब्रिओ बॅक्टेरियाच्या प्रसारासाठी खुल्या किनारपट्टीचे क्षेत्र दरवर्षी 329 किमीने वाढले आहे ज्यामुळे आजारपण आणि मृत्यू होऊ शकतो. या बदलामुळे विक्रमी 1.4 अब्ज लोकांना डायरियासारख्या गंभीर आजाराचा धोका आहे.