Economic Recession | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum) बहुतेक मुख्य अर्थशास्त्रज्ञांनी 2023 मध्ये जागतिक मंदीचे (Global Recession) भाकीत केले आहे. 2023 मध्ये जागतिक मंदीचा धोका आहे असे सुमारे दोन तृतीयांश मुख्य अर्थशास्त्रज्ञ मानतात. साधारण 18 टक्के अर्थशास्त्रज्ञांनी याची पुष्टी केली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या शेवटच्या सर्वेक्षणानंतर मंदीचा अंदाज व्यक्त करणाऱ्या अर्थतज्ज्ञांची संख्या आता दुप्पट झाली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती दिली आहे.

त्यांच्या मते, सध्या चालू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये परिस्थिती अधिक खराब होण्याचा अंदाजही अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पाच दिवसीय वार्षिक बैठकीत, 'चीफ इकॉनॉमिस्ट्स आउटलुक: जानेवारी 2023' या अहवालात हे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने म्हटले आहे की, 2023 मध्ये आर्थिक विकासाची शक्यता विशेषत: युरोप आणि अमेरिकेत कमी आहे.

सर्व मुख्य अर्थशास्त्रज्ञांना 2023 मध्ये युरोपमध्ये ‘कमकुवत किंवा अतिशय कमकुवत’ आर्थिक वाढीची अपेक्षा आहे. 91 टक्के अर्थतज्ज्ञांना अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत खराब कामगिरीची अपेक्षा आहे. या अर्थतज्ज्ञांचा चीनबाबतचा अंदाज 50:50 इतका होता. यासह अर्ध्या अर्थतज्ञांनी सकारात्मक वातावरण परत येण्याची अपेक्षा केली आहे. चीनमधील अत्यंत प्रतिबंधात्मक शून्य-कोविड धोरणाच्या समाप्तीमुळे विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: Microsoft Layoffs 2023: मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांवर संक्रांत; आजपासून शेकडो लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता- रिपोर्ट)

वाढत्या महागाईवर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मुख्य अर्थतज्ज्ञांनी 2023 साठी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. चीनच्या बाबतीत, हा अंदाज 5 टक्के आहे, तर युरोपमध्ये चलनवाढीचा दर 57 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या एक वर्षानंतर, मुख्य अर्थशास्त्रज्ञांना या वर्षी जगातील बहुतेक भागांमध्ये चलनविषयक धोरण स्थिर होण्याची अपेक्षा आहे.