जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणूंवर अद्याप लस किंवा औषध उपलब्ध झालेले नसल्यामुळे जगभरातील प्रत्येक देशाला या संकटाचा सामना करणे अवघड होत आहे. दरम्यान जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 1.37 कोटींची पार गेली आहे. तर मृतांचा आकडा 589,000 हून अधिक झाला आहे. युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) यांच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, शुक्रवारी (17 जुलै) सकाळपर्यंत जगातील कोरोना बाधितांचा आकडा 13,758,533 इतका झाला होता तर 589,093 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.
CSSE च्या आकडेवारीनुसार, कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेल्या अमेरिकत एकूण 3,570,037 कोरोना बाधित रुग्ण असून 138,291 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमावारीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये 2,012,151 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 76,688 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान भारतातील मृत्यूंचे प्रमाण कमी असून आतापर्यंत एकूण 25602 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी पुढील प्रमाणे:
कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी:
अमेरिका | 3,570,037 |
ब्राझील | 2,012,151 |
भारत | 10,03,832 |
रशिया | 751,612 |
पेरू | 341,586 |
दक्षिण आफ्रिका | 324,221 |
मेक्सिको | 324,041 |
चिली | 323,698 |
ब्रिटन | 294,114 |
इराण | 267,061 |
स्पेन | 258,855 |
पाकिस्तान | 257,914 |
इटली | 243,736 |
सौदी अरेबिया | 243,238 |
तुर्की | 216,873 |
फ्रान्स | 211,102 |
जर्मनी | 201,450 |
बांग्लादेश | 196,323 |
कोलम्बिया | 165,169 |
अर्जेंटीना | 114,783 |
कॅनडा | 111,143 |
कतार | 105,477 |
10,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये ब्रिटन (45,204), इटली (35,017), मेक्सिको (34,191), फ्रान्स (30,141), भारत (25602), स्पेन (28,416), इराण (13,608), पेरु (12,615) आणि रशिया (11,920) यांचा समावेश आहे. कोरोनाचे संकट जगभरात कायम असून त्यावरील लसी संशोधनाच्या विविध टप्प्यात आहेत. दरम्यान काही लसींच सकारात्मक परिणाम होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे लवकरच कोविड-19 चे संकट टळेल, अशी आशा आहे.