Gautam Adani Swiss Bank: हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी, स्विस मीडिया आउटलेट गोथम सिटीच्या अहवालाचा हवाला देत, हिंडनबर्गने दावा केला आहे की, स्विस अधिकाऱ्यांनी अदानी समूहाच्या तपासाचा भाग म्हणून स्विस बँकांमध्ये ठेवलेला $310 दशलक्ष (सुमारे 2600 कोटी रुपये) निधी गोठवला आहे. Hindenburg यांनी 12 सप्टेंबर 2024 रोजी X (पूर्वीचे Twitter) वर हा आरोप पोस्ट केला. अहवालानुसार, स्विस अधिकारी 2021 पासून अदानी समूहाविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि सिक्युरिटीज फसवणुकीची चौकशी करत आहेत. या आरोपानंतर अदानी समूहाच्या प्रवक्त्याने हे दावे निराधार, अव्यवहार्य आणि हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. हे देखील वाचा: Quad Summit 2024: अमेरिकेचे अध्यक्ष Joe Biden करणार क्वाड समिटचे आयोजन; 21 सप्टेंबर रोजी होणार महत्त्वाची बैठक
येथे पाहा पोस्ट
Swiss authorities have frozen more than $310 million in funds across multiple Swiss bank accounts as part of a money laundering and securities forgery investigation into Adani, dating back as early as 2021.
Prosecutors detailed how an Adani frontman invested in opaque…
— Hindenburg Research (@HindenburgRes) September 12, 2024
"अदानी समूहाचा स्विस न्यायालयाच्या कोणत्याही कार्यवाहीशी कोणताही संबंध नाही आणि आमच्या कोणत्याही कंपनीचे खाते कोणत्याही प्राधिकरणाने गोठवलेले नाही," असे प्रवक्त्याने स्पष्ट केले. अदानी समूहाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही कोणतेही संकोच न करता म्हणू शकतो की आमच्या समूहाची प्रतिष्ठा आणि बाजार मूल्य कायमचे खराब करण्याचा हा नियोजित आणि गंभीर प्रयत्न आहे." प्रवक्त्याने असेही म्हटले आहे की, स्विस न्यायालयाने कथित आदेशात आमच्या कंपन्यांचा उल्लेख केलेला नाही किंवा आम्ही अशा कोणत्याही प्राधिकरण किंवा नियामक संस्थेकडून कोणतेही स्पष्टीकरण किंवा माहिती मागितलेली नाही. अदानी समूहाने पुनरुच्चार केला की त्यांची विदेशी होल्डिंग संरचना पारदर्शक, पूर्णपणे उघड आणि सर्व संबंधित कायद्यांचे पालन करणारी आहे.
आपल्या दाव्याला आणखी बळकटी देत, हिंडेनबर्ग म्हणाले की, अदानी प्रतिनिधींनी ब्रिटीश व्हर्जिन आयलंड, मॉरिशस आणि बर्म्युडा येथील काही अपारदर्शक फंडांमध्ये गुंतवणूक केली होती, ज्यात बहुतेक अदानी स्टॉक होते. अहवालानुसार, अदानीच्या या प्रतिनिधीने स्विस बँकांमध्ये सुमारे 310 दशलक्ष डॉलर्स ठेवले होते, जे आता गोठवण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची बाजारात चर्चा रंगली आहे. मात्र, अदानी समूहाच्या स्पष्ट वक्तव्यानंतर याप्रकरणी कोणत्याही प्रकारची अनियमितता झाल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळण्यात आला आहे. आता या आरोपाला आणि अदानी ग्रुपमधील भांडण पुढे काय वळण घेते हे पाहायचे आहे.