Imran Khan (Photo- PTI)

पॅरिसमध्ये फायनेंशियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या बैठकीत आज (18 ऑक्टोबर) पाकिस्तान बाबत निर्णय घेतला जाणार आहे. टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंगची प्रकरणे थांबवण्यासाठी यशस्वी न झालेल्या पाकिस्तानची (Pakistan) अवस्था आता दुबळ्यासारखी झाली आहे. तर पाकिस्तानवर ब्लॅक लिस्ट मध्ये जाण्याचे टेंन्शन वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान चीन, तुर्की आणि मलेशियाच्या यांच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तान ग्रे लिस्ट मध्येच राहण्याची शक्यता जास्त आहे.

खरंतर चीन, मलेशिया आणि तुर्की पाकिस्तानसोबत आहेत. त्यामुळे ब्लॅक लिस्टमध्ये न जाण्याची शक्यता कमी आहे. आर्थिक मंत्री हम्माग अजहर यांच्या नेतृत्वातील एका पाकिस्तानी प्रतिनिधींच्या बैठकीत असे सांगण्यात आले की, इस्लामबादने 27 पैकी 20 गुणांमध्ये सकारात्मक प्रगती केली आहे. एफटीएफ यांनी पाकिस्तानसाठी उचलेली पावले आणि काही क्षेत्रातील प्रगती यावर समाधान व्यक्त केले आहे. तसेच चीन, तुर्की आणि मलेशिया यांनी पाकिस्तानबाबत उचललेल्या पावलांचे कौतुक केले आहे. पण भारताने पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट मध्ये घोषित करण्यात यावे याची शिफारस केली आहे. भारताचे असे म्हणणे आहे की, हाफिज सईदच्या निर्बंध घातलेल्या बँक खात्यामधून पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.(FATF यांनी पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्यास भविष्य धोक्यात, देशाला करावा लागेल 'या' परिणांमाचा सामना)

36 देशांच्या एफटीएफ चार्टर यांच्या मते कोणत्याही देशाला ब्लॅक लिस्ट मध्ये न घोषित करण्यासाठी कमीतकमी तीन देशांचे समर्थन असण्याची आवश्यकता आहे. सध्या पाकिस्तान ग्रे लिस्ट मध्ये असून त्या मधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. एफटीएफने मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या विरोधात पूर्ण कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला ऑक्टोबर पर्यंत वेळ देऊ केली होती.