काय सांगता? Pakistan च्या अर्थव्यवस्थेला चक्क गाढवांमुळे चालना; Donkey लोकसंख्या पोहोचली 56 लाखावर
Donkeys (Photo Credits: Pixabay)

गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानमध्ये (Pakistan) गाढवांची (Donkey) लोकसंख्या दरवर्षी एक लाखांनी वाढली आहे. आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये हे दिसून आले आहे. पाकिस्तानमध्ये गाढव हा एकमेव प्राणी आहे ज्याची लोकसंख्या 2001-2002 पासून दरवर्षी एक लाखांच्या दराने वाढत आहे. त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये घोडे आणि खेचरांचा विकास दर जवळजवळ स्थिर आहे. तीन वर्षात देशात तीन लाख गाढवांची वाढ झाल्यानंतर इथल्या गाढवांची लोकसंख्या 56 लाखांवर पोहोचली आहे. तर आता प्रश्न पडतो की, पाकिस्तान या गाढवांचे करतो तरी काय? ही गाढवे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान देत आहेत.

पाकिस्तान देशातील गाढवे चीनला पाठवितो, तिथे त्याची किंमत खूप जास्त आहे. चीनमध्ये गाढवांची कातडी अनेक प्रकारे वापरली जाते. चीन औषध तयार करण्यासाठी गाढवाच्या कातड्यातून घेतलेले जिलेटिन वापरतो. पाकिस्तान चीनला मोठ्या प्रमाणात गाढवांची निर्यात करत असल्याने देशात त्यांची संख्या जास्त आहे. एएनआयच्या अहवालात म्हटले आहे की, गाढवांपासून त्यांचे मालक दिवसाला साधारण हजार रुपये मिळवतात. तसेच त्यांच्या विक्रीमधूनही मालकांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. म्हणून येथील गाढवांचा व्यवसाय तेजीत चालला आहे. (हेही वाचा: पाकिस्तान पंतप्रधान इमरान खानच्या माजी महिला सहाय्यकाने खासदाराच्या लगावली कानशिलात, पहा व्हायरल व्हिडिओ)

अनेक चिनी कंपन्यांनी पाकिस्तानात गाढवांचा व्यापार करण्यासाठी कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. पाकिस्तानमधील गाढवांच्या जातीनुसार त्यांच्या किंमती निश्चित केल्या जातात. यासह, पाकिस्तान जगातील तिसरा मोठा देश आहे जेथे गाढवांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. गाढवांपासून होत असलेल्या फायद्यामुळे पाकिस्तानमध्ये खास गाढवांसाठी वेगळी रुग्णालये स्थापन झाली आहेत.

सर्वेक्षणानुसार म्हशी, घोडा, गाढव, बकरी, मेंढ्या आणि उंट यासह शेतातील प्राण्यांची संख्याही 50.7 लाखांवर गेली आहे. आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, 2019-20 च्या तुलनेत 2020-21 दरम्यान देशात प्राण्यांची संख्या सुमारे 10.9 लाखांनी वाढली आहे.