Watch Video: पाकिस्तान पंतप्रधान इमरान खानच्या माजी महिला सहाय्यकाने खासदाराच्या लगावली कानशिलात, पहा व्हायरल व्हिडिओ

टीव्ही शो दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची निकटवर्तीय महिला नेत्या डॉक्टर फिरदोस आशिक अवान यांनी पाकिस्तानी खासदाराच्या कानशिलात वाजवल्याची घटना समोर आली आहे. पीडित खासदार बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे कादिर मंडोखेल होते असे सांगितले जात आहे.

Watch Video: पाकिस्तान पंतप्रधान इमरान खानच्या माजी महिला सहाय्यकाने खासदाराच्या लगावली कानशिलात, पहा व्हायरल व्हिडिओ
महिला खासदाराने पुरुष खासदाराच्या मारली कानाखालीत (Photo Credit: Twitter)

Firdaus Ashiq Awan Slaps Qadir Mandokhel: टीव्ही शो दरम्यान पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांची निकटवर्तीय महिला नेत्या डॉक्टर फिरदोस आशिक अवान (Firdous Ashiq Awan) यांनी पाकिस्तानी खासदाराच्या कानशिलात वाजवल्याची घटना समोर आली आहे. पीडित खासदार बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (Pakistan People's Party) कादिर मंडोखेल (Qadir Mandokhel) होते असे सांगितले जात आहे. टीव्ही शोच्या रेकॉर्डिंग दरम्यान फिरदौस आणि कादिर यांच्या एका कारणावरुन वाद झाला त्यानंतर त्या एवढ्या भडकल्या की त्यांनी कादिर यांची कॉलर पकडली आणि त्यांच्या कानाखाली मारली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये खान यांच्या पार्टी पीटीआयचा नेता फिरदौस शिवीगाळ करताना देखील दिसत आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार पत्रकार जावेद चौधरी यांच्या एक्सप्रेस टीव्ही चॅनेलवर एका शोच्या रेकॉर्डिंग ही घटना घडली. फिरदोस सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांची विशेष सहाय्यक असून खान यांच्या जवळच्या मानल्या जातात.  या घटनेवर आता फिरदौस यांनी स्पष्टीकरण सादर केले आहे. त्यांनी म्हटलं की पीपीपी खासदार कादिर मंडोखेल यांनी त्यांना आणि त्यांच्या वडिलांबद्दल अपशब्द वापरुन धमकी दिली. ज्यामुळे हे प्रकरण वाढलं. फिरदौस म्हणाल्या की कादिर मंडोखेल यांनी त्यांना असे करण्यास भाग पाडले आणि त्या आता मांडोखेल विरोधात मानसिक छळाचा गुन्हा दाखल करणार आहेत.

फिरदौस यांचे स्पष्टीकरण

सोशल मीडियावर शेअर केलेल्या आपल्या स्पष्टीकरणात फिरदौस म्हणाल्या की, या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ जाहीर केला पाहिजे जेणेकरुन लोकांना कळेल की मला असे करण्यास भाग पाडले गेले आहे. त्यांनी पुढे म्हणाले की, “शो दरम्यान माझी राजकीय प्रतिष्ठा धोक्यात होती. मी या संपूर्ण प्रकरणात माझ्या वकीलांशी बोलत आहे.” विशेष म्हणजे डॉक्टर फिरदौस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले आहेत. त्यांच्यावर सरकारी तिजोरीचा गैरवापर, राजकीय नेमणुका करण्याचा आणि सरकारी जाहिरातींच्या बजेटमधून कमिशन घेतल्याचा आरोप आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2021 12:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).