वैज्ञानिकांचा अंदाज आहे की कोविड-19 (COVID-19) वरील लस येत्या वर्षभरापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी मिळू शकेल असा जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दावा केला आहे. ही लस विकसित, उत्पादन आणि वितरणात जागतिक सहकार्याचे महत्त्व देखील त्यांनी सांगितले. युरोपियन संसदेच्या पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षा यांच्याशी झालेल्या बैठकीत घेब्रेयेसस म्हणाले की, "ही लस उपलब्ध करुन देणे आणि सर्वांना वितरित करणे हे एक आव्हान असेल. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे." सध्या 100 पेक्षा जास्त कोविड-19 लसी डेव्हलपमेंट विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. ते पुढे म्हणाले की या महामारीने जागतिक एकताचे महत्त्व स्पष्ट केले आहे. सोबतच आरोग्याला किंमत म्हणून नव्हे तर गुंतवणूकीच्या रुपात पाहिलं पाहिजे. (Coronavirus: कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जगभरातील संख्या तब्बल 95 लाखांच्याही पुढे; 488,000 पेक्षाही अधिक मृत्यू)
ते म्हणाले की जगातील सर्व देशांनी प्राथमिक आरोग्य सेवेवर काम केले पाहिजे आणि संकटाच्या परिस्थितीसाठी त्यांची तयारी बळकट करावी. युरोपियन युनियनचे जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. महासंचालकांनी कबूल केले की सर्वांनी चुका केल्या आहेत. त्यांनी सदस्यांना सांगितले की WHO चे एक स्वतंत्र पॅनेल महामारीसंदर्भात देण्यात आलेल्या प्रतिक्रियांचे मूल्यांकन करेल, जेणेकरून चुकांमधून धडे घेता येतील. हे पॅनेल लवकरच त्याचे काम सुरू करेल.
दरम्यान, जगभरात कोरोना ग्रस्तांचा आकडा 95 लाखांच्या वर पोहचला आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाचे थैमान कायम आहे. अमेरिकामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 26 हजाराच्या वर पोहचली आहे. दुसऱ्या स्थानावर ब्राझील, तिसऱ्या स्थानावर रशिया तर भारतात चौथे सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात आजवर 4,96,853 इतक्या कोरोना संक्रमित तर 15,391 मृत्यूची नोंद झाली आहे.