जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या अल्पावधीतच एक कोटींच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी (Johns Hopkins University) जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची दैनंदिन आकडेवारी जाहीर करत असते. त्यानुसार जगभारातील कोरोना व्हायर संक्रमित रुग्णांची सख्या आता जवळपास 95 लाख इतकी झाली आहे. यात 488,000 पेक्षाही अधिक मृत्यू झाले आहेत. जॉन्स हॉपकिंन्स युनिवर्सिटी संचलीत सेंटर फॉर सिस्टम साइन्स अँण्ड इंजीनियरिंग (CSSE) शुक्रवारी (26 जून) ताजी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार जगभरात शुक्रवार सकाळपर्यंत कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 9,583,144 इतकी होती. तर जगभरात कोरोना संक्रमित मृतांची संख्या 488,740 इतकी होती.
सीएसएसई (CSSE) ने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरामध्ये अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आणि कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहेत. अमेरिकेत आजघडीला कोरोना संक्रमित 2,418570 रुग्ण आहेत. तर 124,355 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या खालोखाल कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांमध्ये ब्राझिल देशांचा क्रमांक लागतो. ब्राजिलमध्ये एकूण 1,228,114 रुग्ण कोरोना संक्रमित आहेत. तर 54,971 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. (पाहा गेल्या 24 तासात जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची किती वाढली)
जगभरातील देशांची कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी
- अमेरिका - 2,418,570
- ब्राझिल-1,228,114
- रशिया-613,148
- भारत- 473,105
- इंग्लंड- 309,455
- पेरू- 268,602
- चिली- 259,064
- स्पेन- 247,486
- इटली- 239,706
- ईरान- 215,096
- मेक्सिको-202,951
- फ्रांस- 197,885
- जर्मनी- 193,371
- तुर्की- 193,115
- पाकिस्तान- 192,970
- सऊदी अरब -170,639
- बांग्लादेश- 126,606
- दक्षिण अफ्रीका- 118,375
- कॅनडा- 104,463
जगभरामध्ये कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जगभरामध्ये कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 हजारांहून अधिक असलेल्या देशांमध्ये इंग्लंड (43,314), इटली (34,644), फ्रान्स (29,755), स्पेन (28,330), मॅक्सिको (25,060) आणि भारत (14,894) आदी देशांचा समावेश आहे.