कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट अजूनही संपूर्ण जगावर घोंगावत आहे. जगातील कोरोना बाधितांच्या संख्या दिवसागणित वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिलेल्या माहितीनुसार, जगभरात एकूण 92 लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर एकूण 476,900 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) यांच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, बुधवारी सकाळपर्यंत जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 92,39,794 इतका होता. तर मृतांचा आकडा 476,945 आहे. (पहा काल किती होती जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या)
CSSE नुसार जगभरात कोरोना बाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत एकूण 2,346,937 कोरोना बाधित रुग्ण असून मृतांचा आकडा 121,224 इतका मोठा आहे. त्यानंतर 1,145,906 कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याने ब्राझील देश दुसऱ्या स्थानावर आहे. तर ब्राझीलमधील मृतांचा आकडा 52654 इतका आहे.
CSSE च्या आकडेवारीनुसार, अमेरिका, ब्राझील पाठोपाठ 598,878 कोरोना बाधित रुग्णांसह रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. भारतातील देखील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे जगभरातील कोरोना बाधितांच्या क्रमवारीत भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतात एकूण 440215 इतके कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
त्यानंतर ब्रिटेन (307,682), पेरू (260,810), चिली (250,767), स्पेन (246,752), इटली (238,833), इराण (209,970), फ्रान्स (197,804), जर्मनी (192,480), तुर्की (190,165), मॅक्सिको (191,410), पाकिस्तान (185,034), सौदी अरेबिया (164,144), बांग्लादेश (119,198), कॅनडा (103,767) आणि दक्षिण अफ्रीका (106,108) या देशांचा क्रमांक लागतो. तर 10 हजारांहून अधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत ब्रिटेन (43,011), इटली (34,675), फान्स (29,723), स्पेन (28,325), मॅक्सिको (23,377) आणि भारत (14,011) या देशांचा समावेश आहे.