Coronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा
Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Coronavirus Infection: प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नल लान्सेटमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, सार्स-सीओव्ही -2 विषाणू हवेतून पसरतो याचा पुरेसा पुरावा सापडला आहे. कोरोना संसर्ग सार्स-सीओव्ही -2 विषाणूमुळे होतो. यूके, अमेरिका आणि कॅनडाच्या सहा तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक आरोग्य यंत्रणा व्हायरसचे संक्रमण रोखण्यात अयशस्वी ठरत आहे, यास हेचं कारण आहे. प्रामुख्याने हवेच्या प्रसारामुळे लोक कोरोना विषाणूचे बळी पडत आहेत. हा अहवाल तयार करणाऱ्या तज्ज्ञांमध्ये पर्यावरण विषयक संशोधन संस्था आणि कोलोराडो बोल्डर विद्यापीठ जोसे-लुइस जिमेनेझ या विद्यापीठांचा समावेश आहे.

हवेच्या माध्यमातू कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याचा पुरावा खूप जास्त आहे. दुसरीकडे, मोठ्या थेंबाद्वारे प्रसार झाल्याचे प्रमाण खूप कमी पुरावे आहेत. तज्ञांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर सार्वजनिक आरोग्य संस्थांनी लवकरचं आमचे स्पष्टीकरण स्वीकारले पाहिजे. जेणेकरुन हवेच्या माध्यमातून विषाणूचा फैलाव कमी होऊ शकेल. (वाचा - Coronavirus: सुस्त आणि आळशी जीवनशैली असलेल्या कोरोना विषाणू रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे व मृत्यूचा अधिक धोका; British Journal of Sports Medicine च्या अभ्यासामधून खुलासा)

संशोधकांचे म्हणणे आहे की, हात धुणे आणि स्वच्छता ठेवणे यासारख्या उपाययोजना कमी महत्त्वाच्या नसल्या तरी, हवेच्या संसर्गाच्या तत्त्वाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. त्यानुसार, संक्रमित कणांच्या श्वासोच्छ्वासाने एखाद्या व्यक्तीचा आजार होण्याचा धोका वाढतो.

या आधारे काढलेले निष्कर्ष -

एका प्रकरणात एका व्यक्तीस 53 लोक संसर्गित झाले. अभ्यासात असे दिसून आले की, त्यांचा जवळ संबंध नव्हता किंवा त्यांनी कोणत्याही वस्तूंना स्पर्श केला नव्हता. तरी कोरोना संसर्ग पसरला. बाहेरच्या तुलनेत बंद खोलीत सार्स-सीओव्ही -2 चा प्रसार जास्त होतो. परंतु, जर बंद खोलीत हवेची ये-जा होत असेल तर विषाणूचा प्रसार कमी होतो. ज्या कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे नसतात आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी नसते त्या रुग्णांच्या माध्यमातून 40 टक्के संक्रमण होण्याची भीती असते.