Covid 19 | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोविड 19 हा विषाणू म्हणजेच कोरोना व्हायरस हा चीनच्या प्रयोगशाळेतून लिक झाल्याचा दावा हा निराधार असल्याचे विधान अमेरिकी अभ्यासकांनी केले आहे. तसेच, हा दावा केवळ चीनला दोषी ठरविण्यासाठी केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील पेनसिल्वेनिया यूनिवर्सिटीत सूक्ष्म जीव विभागाचे प्रोफेसर फ्रेडरिक बुशमॅन यांनी हे विधान केले आहे. फ्रेडरिक यांनी 7 मे या दिवशी सीएमजीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत कोविड 19 व्हायरस चीनमधील प्रयोगशाळेतून लिक झाल्याचा दावा निराधार असल्याचे म्हटले. दरम्यान, जगभरातील अनेक अभ्यासकांनीही अमेरिकेच्या दाव्यावर टीका केली आहे.

फ्रेडरिक बुशमॅन यांनी म्हटले आहे की, चीनच्या प्रयोगशाळेतून कोविड 19 विषाणून लिक झाल्याचा दावा पटणारा नाही. हा दावा अत्यंत निराधार आहे. शक्यता आहे की, नोवेल कोरोना व्हायरस माणसांमध्ये जनावरांच्या माध्यमातून आला असू शकतो. हा विषाणू एखाद्या प्राण्यातून मानसात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. हा व्हायरस जाणीवपूर्वक किंवा मानवनिर्मित असल्याचा कोणताही पुरावा अद्यापपर्यंत पुढे आला नाही.

दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्या छुनइंग यांनी 7 मे रोजी एका वक्तव्यात म्हटले आहे की, कोविड 19 हा विषाणून चीनच्या प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आला नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री हे कोणताही पुरावा नसताना जाणिवपूर्वक चीनवर आरोप करत आहेत. खोटे बोलत आहेत. प्रसिद्ध अमेरिकी अर्थशातज्ज्ञ जेफरी डी. साक्स यांच्या आलेखाचा हवाला देत अमेरिकी सरकारद्वारा चीनवर केले जाणारे आरोप निराधार आहेत, असेही छुनइंग यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: COVID 19 विषाणू उत्पत्तीबद्दल आम्हाला माहिती नाही; वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वक्तव्यामुळे अमेरिकेत कोरनाबद्दल एकवाक्यता नसल्याची चर्चा)

चीनी प्रवक्ता छुनइंग यांनी पुढे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस बाबतचे विश्लेशन हे विज्ञानाच्या आधारावर करण्यात यायला हवे. दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा अमेरिकेने देशांतर्गत सुरु असलेल्या महामारीवर ध्यान देणे अधिक आवश्यक आहे. जेणेकरुन अमेरिकी जनता सुरक्षीत राहिल. आम्हाला आशा आहे की अमेरिका लवकरच आपल्या देशात पसरलेली महामारी नियंत्रणात आणेन. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजनांसाठी चीन मदत करायला तयार आहे.