Mark Milley. (File Photo: IANS)

अमेरिकी लष्कराचे जनरल (US General) आणि संयुक्त चीफ ऑफ स्टाफ अध्यक्ष मार्क (Mark Milley) मिले यांनी आम्हाला कोरोना व्हायरस (Coronavirus) कसा निर्माण झाला याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे. वृत्तसंस्था सिन्हुआचा दाखला देत आयएएनएस वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मार्क मिले यांना जेव्हा कोविड 19 विषाणुच्या उत्पत्तीबाबत विचारले असता 'हा व्हायरस एखाद्या वायरोलॉजी लॅबमथून आला आहे की, याची निर्मिती वुहान येथील मार्केटमधून झाली की आणखी कुठे?' याबाबत आम्हाला माहिती नसल्याचे म्हटले. दरम्यान, मिले यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकी अधिकाऱ्यांच्यातच कोरोना व्हायरस उत्पत्तीबद्दल एकवाक्यता नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो (Mike Pompeo) यांनी नुकताच दावा केला होता की, अमेरिका सरकारकडे ठोस पुरावा आहे की, कोरोना व्हायरस (Coronavirus) निर्मिती ही चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच झाली आहे.

पुढे बोलताना मार्क मिले यांनी म्हटले की, नागरिक आणि अमेरिकी सरकार यांच्यासह अनेक वृत्तसंस्था कोरोना व्हायरस उत्पत्तीबाबत छाननी आणि तपास, संशोधन करत आहेत. मिले यांनी पुढे म्हटले की, केवळ संशोधनानंतरच हा व्हायरस मानवनिर्मित आहे की, नैसर्गिक याबाबत माहिती मिळू शकेल, असेही मिले यांनी म्हटले. (हेही वाचा, Coronavirus चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच COVID-19 निर्मिती, आमच्याकडे पुरावा; अमेरिकेचा दावा)

परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी काही दिवसांपूर्वीच दावा केला होता की, अमेरिका सरकारकडे ठोस पुरावा आहे की, कोरोना व्हायरस मानवनिर्मित असन, त्याची निर्मिती ही चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच झाली आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक आणि अभ्यासकांना, तज्ज्ञांनाही असेच वाटते की, हा व्हायरस मानवनिर्मितच आहे. आम्हाला कोणावर अविश्वास दाखवण्याचे काहीच कारण नाही. परंतू, अवघ्या जगाला संक्रमित करण्याचा चीनला इतिहासच आहे. चिनमधील प्रयोगशाळांतील साफसफाई आणि सुरक्षिततेच्या बाबतीत अत्यंत वाईट परिस्थिती आहे.