Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणूची (Coronavirus) प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत, जर परिस्थिती अशीच राहिली तर आरोग्य यंत्रणेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे 1918 मध्ये आलेल्या एचआयएनआय इन्फ्लूएन्झा (HINI Influenza) सारखाच कोरोनाच उद्रेक देखील होऊ शकतो. त्याकाळी इन्फ्लूएन्झामुळे जगात 50-100 दशलक्ष, म्हणजेच जवळपास 5-10 कोटी लोक मरण पावले होते. कोरोनामुळे आताही अशीच परिस्थिती निर्माण होईल, हा दावा मेडिकल जनरल द लॅन्सेट (The Lancet) मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन पत्रात केला आहे. म्हणजेच कोरोना विषाणूमुळेही इतक्याच व्यक्ती मरण पावण्याची शक्यता आहे.

चायनिज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे (Chinese Centre for Disease Control and Prevention) संचालक गाओ फू यांच्या नेतृत्वात केलेल्या संशोधन पेपरात असेही म्हटले आहे की, हंगामी इन्फ्लूएंझाचा केस-फॅटॅलिटी रेशो (Case-Fatality Ratio) सुमारे 0.1 टक्के आहे. चीनच्या हुबेई प्रांतात कोविड-19 चा अंदाजे सीएफआर 5.9 टक्के आणि चीनच्या इतर सर्व क्षेत्रांमध्ये 0.98 टक्के होता.

या संशोधन पेपरात याबाबतही चर्चा झाली की, 'कोरोनाच्या वाढत्या घटनांचा आपल्या वैद्यकीय प्रणालीवर परिणाम होईल, ज्यामुळे जास्त मृत्यू होण्याची शक्यता आहे. कोविड-19 ची सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला स्थिती अजून बिघडू शकते व ज्याचा परिणाम 1918 एचआयएनआय इन्फ्लूएंझाच्या रूपाने समोर येऊ शकतो. इन्फ्लूएंझामध्ये सीएफआर 2% पेक्षा जास्त होता आणि त्यामुळे जगभरात 50 ते 100 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता. प्रसिद्ध वैद्यकीय जनरल, दि लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधनिबंधाला 'Active case finding with case management: the key to tackling the Covid-19 pandemic', असे नाव देण्यात आले आहे. (हेही वाचा: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 1 हजार 964 कोरोनाबाधित; दिवसभरात 11 नव्या रुग्णांची नोंद)

दरम्यान, 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूला साथीचा रोग जाहीर केले होते. यानंतर कोरोना पॉझिटिव्हच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. 31 मे पर्यंत 200 पेक्षा जास्त देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झाला होता. 9 जूनपर्यंत जगात कोरोना प्रकरणांची संख्या 73 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्याचबरोबर या साथीने आतापर्यंत 4 लाख 14 हजाराहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.