कोरोना व्हायरस (Coronavirus) या जागतिक साथीच्या प्रसाराला रोखण्यासाठी योजलेल्या लॉक डाउनमुळे (Lockdown) अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. गेल्या महिन्यात जगभरात कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनामध्ये (Carbon Dioxide Emissions) तब्बल 17 टक्क्यांची घट झाली आहे. एका नव्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत शास्त्रज्ञ म्हणतात की, जेव्हा सर्व जनजीवन सर्वसामान्य होईल, तेव्हा हवामान बदलाच्या संदर्भात प्रदूषणात झालेली ही अल्प-मुदत घट एखाद्या समुद्राच्या थेंबासारखी असेल. जर वर्षभर काटेकोरपणे लॉकडाउन पाळल्यास प्रदूषण पातळी 7% पर्यंत असेल आणि जर निर्बंध हटविले गेले तर ते 4% पर्यंत असेल.
कोरोना व्हायरस जागतिक साथीच्या दरम्यान, कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाबाबतील झालेल्या अभ्यासानुसार, वैज्ञानिकांच्या गटाने असा अंदाज लावला की, प्रदूषण पातळी मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे आणि यंदा ते चार ते सात टक्क्यांच्या दरम्यान ती असेल, जे 2019 च्या पातळीपेक्षा कैक पतीने कमी आहे. महत्वाचे म्हणजे द्वितीय विश्वयुद्धानंतर कार्बन उत्सर्जनातील ही सर्वात मोठी वार्षिक घट आहे. एप्रिलमधील एका आठवड्यात अमेरिकेने आपल्या कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाची पातळी फार मोठ्या प्रमाणात कमी केली. जगातील सर्वात मोठा कार्बन उत्सर्जक असलेल्या चीन,ने फेब्रुवारी महिन्यात कार्बन प्रदूषणात सुमारे एक चतुर्थांश कपात केली. भारत आणि युरोपमधील अनुक्रमे 26 आणि 27 टक्क्यांनी घट झाली. हा अभ्यास मंगळवारी नेचर क्लायमेट चेंज या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. (हेही वाचा: धक्कादायक! प्रदूषणामुळे गंगा पठारावर राहणाऱ्या लोकांचे आयुर्मान 7 वर्षांनी घटले)
लॉकडाऊन 4 दरम्यान अनेक नियम शिथिल झाल्याने, गाझियाबादमधील प्रदूषणाची पातळी खूप वेगाने वाढली आहे. मंगळवारी हे शहर देशातील दुसर्या सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत सामील झाले. एअर क्वालिटी इंडेक्समध्ये गेल्या तीन दिवसांपासून, गाझियाबादमधील प्रदूषण पातळी खराब वर्गात नोंदविली जात आहे. तिसर्या दिवशीही याची नोंद 237 झाली. वायू प्रदूषणात इतकी वाढ होण्याचे कारण म्हणजे रस्त्यांवरील वाहनांची संख्या आणि उद्योगांचे सुरु होणे हे आहे.