Delhi Pollution (PC - PTI)

Delhi Pollution: दिल्लीमध्ये प्रदूषणाची (Pollution) समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यंदाचा नोव्हेंबर महिना 2015 नंतर नऊ वर्षांतील सर्वात प्रदूषित महिना असणार आहे. या महिन्याच्या 24 दिवसांपैकी असा एकही दिवस गेलेला नाही जेव्हा दिल्लीचा AQI 200 च्या खाली गेला असेल. या महिन्यात दिल्लीतील लोकांना सतत 'खराब', 'खूप वाईट', 'गंभीर किंवा 'अत्यंत गंभीर' श्रेणीतील हवा श्वास घ्यावी लागत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दिल्लीचा AQI 500 वर पोहोचला आहे. हवेची ही पातळी "गंभीर" श्रेणीत मोडते. एक दिवस आधी शुक्रवारी ते 400 होते. 24 तासांत त्यात 25 अंकांची वाढ झाली आहे.

दिल्लीतील वीस क्षेत्रे आहेत जिथे AQI "अत्यंत गंभीर" श्रेणीत पोहोचला आहे. येथील AQI 400 च्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, काही भागात AQI 470 च्या पुढे गेला आहे. हे सर्व क्षेत्र आधीच प्रदूषणाचे हॉट स्पॉट म्हणून ओळखले जातात. या भागाची नावे पुढीलप्रमाणे - Supreme Court on Delhi Pollution: दिल्लीकरांच्या आरोग्याशी खेळू नका, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले)

आनंद विहार- 460

अलीपूर- 446

बवना- 468

बुरारी-427

करणी सिंग शूटिंग-416

द्वारका 437

IGI विमानतळ-423

जहांगीरपुरी-469

जवाहरलाल नेहरू स्टेडियम-402

मेजर ध्यानचंद स्टेडियम-420

टेंपल रोड 417

वजीरपूर-464

विवेक विहार-471

सोनिया विहार-449

शादीपूर-401

नरेला-431

पटपरगंज-462

पंजाबी बाग-463

आरके पुरम-430

नजफगड-404

मानकांनुसार, हवेतील प्रदूषक कण PM 10 ची पातळी 100 पेक्षा जास्त आणि PM 2.5 ची पातळी 60 पेक्षा जास्त नसावी. जेव्हा ते यापेक्षा कमी पातळीवर असते तेव्हाच ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण, शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता दिल्ली आणि एनसीआरच्या हवेत पीएम 10 ची सरासरी पातळी 413 होती आणि पीएम 2.5 ची सरासरी पातळी 239 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होती. म्हणजेच दिल्ली आणि एनसीआरच्या हवेतील प्रदूषक कणांची सरासरी पातळी मानकांपेक्षा चार पट जास्त आहे.

सध्या दिल्लीत वाऱ्याचा वेग खूपच कमी झाला आहे. विशेषत: सकाळच्या वेळी वारा अतिशय शांतपणे वाहत असतो. दिवसा वारा वाहत असतानाही त्याचा वेग ताशी चार किलोमीटर इतकाच राहतो. त्यामुळे प्रदूषक कणांचा प्रसार अत्यंत संथ होत चालला आहे. आकाशातही धुक्याचा थर पसरला आहे. लोकांना सामान्यपेक्षा जास्त प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.