आशिया खंडातील प्रमुख महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला चीन (China) हा देश सध्या आर्थिक मंदीकडे वाटचाल करतो की काय अशी स्थिती आहे. चीनी अर्थव्यवस्था (Chinese Economy) सध्या अडचणीचा सामना करत असून, सकल राष्ट्रीय उत्पादन (Gross Domestic Product) म्हणजेच जीडीपी कमालीचा घसरताना दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार चीनचा जीडीपी (China GDP) हा गेल्या 27 वर्षांच्या तूलनेत सर्वात निचांकी पातळीला गेला आहे. नॅशनल ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स द्वारे सोमवारी (15 जुलै 2019) रोजी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चीनचा जीडीपी वृद्धी दर हा 2019 च्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीच्या 6.2 टक्के इतका राहिला आहे.
चीनच्या विकासदराच्या वृद्धीत मंदी येण्याचे प्रमुख कारण हे अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेले व्यापार युद्ध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. नॅशनल ब्युरो ऑफ स्टेटिस्टिक्स ने म्हटले आहे की, वर्ष 2019 च्या एप्रिल - जून दरम्यान जीडीपी वृद्धी दर हा 6.2 टक्के म्हणजेच पहिल्या तिमाहिच्या 6.4 टक्के इतका होता.
बीजिंग आणि वॉशिंग्टन यांच्यात गेले प्रदीर्घ काळ व्यापारयुद्ध सुरु आहे. त्याचा प्रचंड मोठा परिणाम चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावर पडताना दिसत आहे. दरम्यान, बिजिंगच्या अधिकाऱ्यांनी आपल्या समकक्ष असलेल्या अमेरिकी अधिकाऱ्यांसोबत चर्चेद्वारे तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, त्याला अद्याप म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. (हेही वाचा, ILO Report 2019: सावधान! तुमची नोकरी धोक्यात आहे; 2030 पर्यंत संपणार 34 दशलक्ष जॉब)
दरम्यान, नॅशनल ब्युरो ऑफ स्टेटिस्टिक्सने असेही म्हटले आहे की, देशाबाहेरी अनिश्चित कारणांमुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव आहे. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था संध्या संघर्षातून वाटचाल करत आहे.