Boat Capsized in Central African Republic: मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये बोट उलटून मोठी दुर्घटना; 50 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, शोध मोहिम सुरू
Photo Credit - X

Boat Capsized in Central African Republic : मध्य आफ्रिकन रिपब्लिक (Central African Republic)देशाची राजधानी बांगुईमध्ये शनिवारी प्रवासी बोट उलटल्याची (Boat Sink) मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेवेळी 300 हून अधिक जण बोटमधून प्रवास करत होते. त्यात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जवळपास 50 हून अधिक नागरिकांचा मृत्यू (death)झाल्याची सांगण्यात येत आहे. सकाळ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे 300 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट शुक्रवारी राजधानी बांगुई येथे मापोको नदी (Mapoko River) ओलांडत होती तेव्हा उलटली. (हेही वाचा :Odisha News: महानदीत बोट उलटली, एकाचा मृत्यू, बचाव कार्य सुरु )

बोट उलटल्याचे समजताच स्थानिक मच्छिमारांनी बचावकार्याला सुरूवात केली. बचाव कार्यात सहभागी असलेला मच्छिमार एड्रियन मोसामो यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले की, लष्कर घटनास्थळी पोहोचेपर्यंत किमान 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. लष्कराची शोध मोहिम अजूनही सुरू आहे. मृतांची संख्या वाढत असल्याचे एड्रियन मोसामो यांनी म्हटले. (हेही वाचा :Gadchiroli Boat Capsized: वैनगंगा नदीमध्ये नाव उलटल्याने सहा महिला बेपत्ता, एक मृतदेह सापडला )

दरम्यान, बोट उलटल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या नागरिकांच्या मृत्यूंमुळे मृतांच्या नातेवाईकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.