गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीमध्ये (Wainganga River) नाव उलटल्याने सहा महिला बेपत्ता झाल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून महिलांचा शोध घेतला जात आहे. पण अद्याप बचाव पथकाला यश आले नाही. सहा महिला नदीमध्ये पडल्याची महिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आले आहे. (हेही वाचा - Sindhudurg 4 Girls Drowned: देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले पाचं पर्यटक बुडाले, 4 मुलींचा मृत्यू, 1 मुलगा बेपत्ता)
या महिला मिरची तोडणीला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांची नाव उलटली. नावाडी पोहून पाण्याबाहेर आला. त्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण वाचवण्यात अपयश आले. एका महिलेचा मृतदेह मिळाला आहे. पाच महिलांचा शोध घेणं अद्याप सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 4 तासानंतरही शोधकार्य सुरुच आहे, पण अद्याप यश मिळाले नाही.
या घटनेत गणपूर (रै.) येथील पोलीस पाटलाची पत्नीसुध्दा वाहून गेल्याची माहिती प्राप्त होत आहे. पाण्यात बुडालेल्या महिलांपैकी एका महिलेचा मृतदेह सापडला असून अन्य पाच महिलांचा शोध घेतला जात आहे.