Babies In Labs: आता प्रयोगशाळेत जन्माला येणार मुले; जपानी शास्त्रज्ञ करत आहेत काम, उंदरांवर यशस्वी प्रयोग
Baby | Representative Image | (Photo Credits: Pixabay)

प्रयोगशाळेत भ्रूण तयार करण्याचे तंत्रज्ञान आधीच विकसित झाले आहे, परंतु आता भविष्यात प्रयोगशाळेत चक्क मुलेही जन्माला (Babies In Labs) येतील. जपानी शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. म्हणजेच येत्या काही वर्षांत वीर्य आणि अंड्याशिवाय मुले जन्माला येतील. शास्त्रज्ञांना प्रयोगशाळेत अंडी आणि शुक्राणू तयार करण्यात यश आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशाप्रकारे जपानी संशोधकांची एक टीम 2028 पर्यंत प्रयोगशाळेत बाळांना जन्म देण्याच्या पद्धतीवर काम करत आहे.

एका अभ्यासानुसार प्रयोगशा बाळांचा जन्म झाल्यास वंध्यत्व आणि इतर जन्म दोषांवर उपचार करण्यास मदत ठरू शकेल. सामान्य मानवी पेशींमधून प्रयोगशाळेत अंडी आणि शुक्राणूंची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याचे क्युशू विद्यापीठातील संशोधकांचे उद्दिष्ट आहे. प्रयोगशाळेत उंदरांचे शुक्राणू आणि अंडी बनवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. यापासून, भ्रूण देखील तयार केले जातील, जे नंतर कृत्रिम गर्भात विकसित केले जातील. जपानच्या क्युशू विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्रा. कात्सुहिको हयाशी यांच्या नेतृत्वाखाली उंदरांवर केलेले प्रयोग यशस्वी झाले आहेत. आता हे परिणाम मानवांमध्ये लागू करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. (हेही वाचा: Eating Lots Of Sugar: जास्त साखर खाण्यामुळे होऊ शकतो हा गंभीर आजार, जाणून घ्या अधिक माहिती)

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात, टीमने नर उंदरांच्या त्वचेच्या पेशींना प्लुरिपोटेंट स्टेम पेशींमध्ये रूपांतरित करण्याच्या त्यांच्या पद्धतीचे वर्णन केले आहे, जे संभाव्यपणे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी किंवा ऊतींमध्ये विकसित होऊ शकतात. नंतर त्यांनी या पेशी एका औषधाने वाढवल्या ज्याने नर उंदीर स्टेम पेशींना स्त्री पेशींमध्ये रूपांतरित केले, ज्याने व्यवहार्य अंडी पेशी तयार केल्या. ही अंडी नंतर नवजात नर उंदरांची निर्मिती करण्यासाठी फलित करण्यात आली.

यापूर्वी टीमने सिंथेटिक सरोगसी पद्धतीचा वापर करून दोन नर उंदरांपासून उंदीर तयार केले होते. नवीन अभ्यासात, 630 पैकी फक्त सात भ्रूण जिवंत उंदराच्या पिल्लांमध्ये विकसित झाले. संशोधकांचा असा विश्वास आहे की या प्रयोगाचा मानवी पुनरुत्पादनावर संभाव्य परिणाम होऊ शकतो. डॉ. हयाशी यांचा अंदाज आहे की, ही कृत्रिम पुनरुत्पादन पद्धत क्लिनिकमध्ये वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी 10-20 वर्षे चाचण्या लागतील. निव्वळ तंत्रज्ञानाच्या बाबतीत येत्या काही वर्षांत प्रयोगशाळेत मुलांना तयार करणे शक्य आहे.