20 Years of 9/11 Attacks: अमेरिकेच्या इतिहासातील 'काळा दिवस', World Trade Center वर झालेल्या हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण; 3000 लोकांचा मृत्यू, हजारो जखमी, जाणून घ्या काय घडले 'त्या' दिवशी
9/11 attacks (Photo Credits: Wikimedia Commons)

[Poll ID="null" title="undefined"]. जगातील सर्वात मोठ्या हा दहशतवादी हल्ल्यात तब्बल 2996 लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. त्या दिवशी 19 अल-कायदा दहशतवाद्यांनी 4 प्रवासी विमानांचे अपहरण केले आणि त्यापैकी दोन न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर धडकवले. यामध्ये विमानातील लोकांसह इमारतीमध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले.

11 सप्टेंबर 2001 दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे झाली. परंतु रात्री दहापर्यंत हा दिवस जगाच्या इतिहासातील सर्वात धोकादायक दहशतवादी हल्ल्यात आणि पर्ल हार्बरनंतर अमेरिकेवरील सर्वात भीषण हल्ल्यात बदलला होता. पहिले विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी 8:46 वाजता उत्तर टॉवरवर आदळले, तर दुसरे विमान सकाळी 9:03 वाजता दक्षिण टॉवरला धडकले. या अपघातामुळे दोन्ही इमारतींना आग लागली. लोक वरच्या मजल्यांमध्ये अडकले होते आणि संपूर्ण शहर धूराने भरले होते. दोन तासांत ही 110 मजली इमारत पूर्णपणे कोसळली.

यावेळी ज्या विमानाने हल्ला करण्यात आला होता त्याचा वेग 987.6 किमी/ तासपेक्षा जास्त होता. थोड्या वेळाने तिसरे विमान सकाळी 9:37 वाजता, वॉशिंग्टन डीसीपासून थोड्या अंतरावर असलेल्या अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनशी धडकले. चौथे विमान दहा वाजून तीन मिनिटांनी पेनसिल्व्हेनियाच्या मैदानावर कोसळले. असे मानले जाते की अतिरेकी या विमानातून वॉशिंग्टन डीसी मधील कॅपिटल इमारतीवर हल्ला करणार होते.

या चार विमानांमध्ये एकूण 246 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, त्या सर्वांचा मृत्यू झाला. वर्ल्ड ट्रेड टॉवरच्या दोन्ही इमारती कोसळून 2,606 लोकांचा मृत्यू झाला. पेंटागॉन हल्ल्यात 125 लोकांचा मृत्यू झाला. अंदाजानुसार, जेव्हा पहिले विमान वर्ल्ड ट्रेड टॉवरवर आदळले तेव्हा सुमारे 17,400 लोक इमारतीत उपस्थित होते. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये 77 देशांच्या नागरिकांचा समावेश होता. या व्यतिरिक्त, ढिगाऱ्याखाली अडकल्याने न्यूयॉर्क शहरातील 441 लोकांचा मृत्यू झाला.

इस्लामिक अतिरेकी गट अल कायदाने अफगाणिस्तानातून हे हल्ले घडवले होते. अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनने मुस्लिम देशांमध्ये सुरू झालेल्या संघर्षासाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना जबाबदार धरले. म्हणून अल कायदाच्या 19 हल्लेखोरांनी ही घटना घडवली होती. (हेही वाचा: अफगानिस्तानमध्ये सुरु होणार Taliban राजवट; सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी चीन, पाकिस्तानसह 6 देशांना निमंत्रण- Report)

11 सप्टेंबरच्या हल्ल्याच्या एका महिन्याच्या आत, तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अल कायदा आणि ओसामा बिन लादेनला संपवण्यासाठी अफगाणिस्तानवर आक्रमण केले. या मोहिमेत अमेरिकेला इतर देशांचीही मदत मिळाली. सुमारे दहा वर्षांनंतर 2011 मध्ये ओसामा बिन लादेनला अमेरिकन सैन्याने पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये ठार केले. 11 सप्टेंबरच्या हल्ल्याचा कथित रणनीतिकार खालिद शेख मोहम्मदला 2002 मध्ये पाकिस्तानमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. आता अमेरिकन सैनिक गेल्या महिन्यात 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानातून परतले आहे. यानंतर इस्लामिक अतिरेकी पुन्हा सक्रिय होऊ शकतात ही भीती व्यक्त केली जात आहे.