कॅनडा कॉलेज प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

Colleges Closed in Canada: कॅनडामध्ये शिकणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. क्युबेकमधील 3 महाविद्यालये अचानक बंद केल्याने या विद्यार्थ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. समस्या लक्षात घेऊन, ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयाने शैक्षणिक संस्थांच्या स्थितीतील बदलामुळे प्रभावित झालेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी एक सल्ला जारी केला आहे. असे अनेक विद्यार्थीही या समस्येत अडकले आहेत, जे सध्या भारतात आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

अहवालानुसार, मॉन्ट्रियलमधील एम कॉलेज, शेरब्रुकमधील सीडीई कॉलेज आणि लॉन्ग्यूइलमधील सीसीएसक्यू कॉलेजने अचानक विद्यार्थ्यांना नोटीस पाठवली की, या महिन्यापासून कॉलेज पूर्णपणे बंद होत आहेत. ही तिन्ही महाविद्यालये Rising Phoenix International (RPI) Inc या एकाच फर्मद्वारे चालवली जात होती. आता या कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. या अर्जाच्या एक वर्ष आधी क्यूबेकने एम कॉलेज आणि सीडीई कॉलेजसह इतर अनेक खासगी कॉलेजांची चौकशी सुरू केली होती. त्यांच्याकडून अनेक प्रकारचे तपशील विचारण्यात आले. आता अचानक कॉलेज बंद झाल्याने त्यात शिकणारे विद्यार्थी नाराज झाले आहेत. (वाचा - Russia Ukraine Crisis: रशियाची युक्रेनवर पूर्ण ताकदीने हल्ला करण्याची योजना)

उच्चायुक्तालयाने जारी केला सल्ला -

त्रस्त विद्यार्थ्यांना आता काय करावे? असा प्रश्न पडला असेल. यातील अनेक विद्यार्थी असे आहेत की, त्यांना हजारो डॉलर्सची फी घेऊन कोणताही इशारा न देता येण्यास भाग पाडले गेले. भारतात राहणाऱ्या अशा अनेक विद्यार्थ्यांनी उच्चायुक्तांशीही संपर्क साधला आहे. या सर्व समस्या पाहता भारतीय उच्चायुक्तालय आता सक्रिय झाले असून त्यांनी या समस्येत अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यांना कोणतीही अडचण आल्यास उच्चायुक्तांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.

अॅडव्हायजरीमध्ये काय सांगण्यात आलं आहे?

भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये विद्यार्थ्यांना सतर्क करणारे अनेक संदेश देण्यात आले आहेत. यातील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

  • कोणत्याही विद्यार्थ्याला फी परत मिळण्यात अडचण आल्यास, ते क्युबेक सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार करू शकतात.
  • त्यात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी उच्चायुक्तालय स्वतः फेडरल सरकार, क्युबेकचे प्रांतिक सरकार तसेच कॅनडातील भारतीय समुदायाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींची भेट घेत आहे.
  • अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, अडकलेले विद्यार्थी ओटावा येथील उच्चायुक्तालयाच्या शिक्षण शाखेकडे किंवा टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात जाऊ शकतात.
  • अॅडव्हायझरीमध्ये, कोणत्याही अविश्वासू शैक्षणिक संस्थेला कोणतेही पेमेंट करण्यास मनाई आहे.

पैसे मिळाल्यानंतर व्हिसा मागणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीला पैसे देऊ नका, असेही सांगण्यात आले आहे.