Russia Ukraine Crisis: रशियाची युक्रेनवर पूर्ण ताकदीने हल्ला करण्याची योजना
Ukrain-Russia Crisis (Photo Credits-Twitter)

Russia Ukraine Crisis: रशियाने युक्रेनच्या सीमेवरून आपले सैन्य मागे घेत असल्याचे म्हटले असेल, परंतु अमेरिकेने त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला नाही. नाटोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कर्मचारी आता युक्रेनच्या राजधानीतून पश्चिमेकडील लिव्ह शहरात हलवले जात आहेत. याशिवाय अधिकारी बेल्जियमलाही पाठवले जात आहेत. ते म्हणाले, आमच्या कर्मचार्‍यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांना कीवमधून लिव्ह आणि ब्रसेल्स येथे हलवण्यात आले आहे.

इतर अनेक पाश्चात्य देशांनी आधीच त्यांच्या मुत्सद्यांना कीवमधून दुसऱ्या शहरात हलवले आहे. लिव्ह शहर पोलंडच्या सीमेवर आहे आणि त्याच्या आजूबाजूला रशियन सैन्य नाही. ब्रुसेल्समध्ये नाटोचे मुख्यालय देखील आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो आणि जो बिडेन म्हणाले होते की रशिया काही आठवड्यात युक्रेनला लक्ष्य करणार आहे. यातील पहिले लक्ष्य कीव असू शकते. (वाचा - Ukraine मध्ये अडकलेल्या भारतीयांना एअर इंडिया मायदेशात आणणार, 22 फेब्रुवारी पासून तीन फ्लाइट चालवल्या जाणार)

युक्रेन नाटोचा सदस्य नाही आणि येथे कोणतेही सैन्य नाही. तथापि, 1990 पासून, नाटोने कीवमध्ये त्यांची दोन कार्यालये सुरू केली आहेत. नाटो आणि युक्रेनियन सरकार यांच्यात संवाद स्थापित करण्यासाठी आणि संरक्षण, सुरक्षेची काळजी घेण्यासाठी एक कार्यालय तयार केले गेले आहे.

दरम्यान, युक्रेन-रशियामध्ये सुरू असलेला तणाव आणि रशिया युक्रेनवर हल्ला करेल या भीतीने रशियाने शनिवारी युक्रेनच्या सीमेजवळ अण्वस्त्रधारी लष्करी सराव सुरू केला. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यासमवेत नियंत्रण केंद्रावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणी प्रक्षेपणाचीही चाचणी घेतली.

रशियाच्या या धोरणात्मक डावपेचांमुळे पाश्चात्य देशांची चिंता वाढली आहे. रशियाने हल्ला करण्याचा निर्णय घेतला असून अण्वस्त्र हल्ल्याच्या पर्यायावरही विचार करत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचे मत आहे.