Air India | (Photo Credits: Facebook)

रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरु असलेल्या वादामुळे मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. अशातच त्यांच्या सुरक्षिततेवर समस्या उद्भावली आहे. पण आता एअर इंडियाने भारतीयांना युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी उड्डाणे सुरु करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया 22. 24 आणि 26 फेब्रुवारी 2022 रोजी भारत-युक्रेन दरम्यान तीन फ्लाइट्स चालवणार आहे. भारतातून एअर इंडियाचे विमान बोरिस्पिल इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहचणार आहे. फ्लाइट्सचे बुकिंग एअर इंडिया बुकिंग कार्यालय, बेवसाइट, कॉल सेंटर आणि अधिकृत ट्रॅवल एजेंसीच्या माध्यमातून करता येणार आहे.

हिंदूस्थान टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय नागरिक राहतात. त्यापैकी 18 हजार भारतीय विद्यार्थी आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या वादामुळे भारतातील उड्डाणे महागडी झाली आहेत. 20 फेब्रुवारीनंतरच आता ती उपलब्ध असणार आहेत. सुत्रांनी बुधवारी असे म्हटले की, भारत आणि युक्रेन दरम्यान उड्डाणांची संख्या वाढण्यावर परराष्ट्र मंत्रालय आणि नागरिक उड्डयन मंत्रालयांसह काही एअरलाइन्समध्ये चर्चा सुरु आहे. युक्रेनच्या शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या नुसार, युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी 24 टक्के हे भारतातील विद्यार्थी आहेत.(Russia-Ukraine Crisis: यूक्रेनवर आक्रमण केल्यास गंभीर परिणाम होतील, USA कडून रशियाला इशारा)

Tweet:

भारताने मंगळवारी युक्रेनमधील आपल्या नागरिकांना देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. कीव मध्ये भारतीय दूतवासाने युक्रेन मध्ये भारतीयांना देशात किंवा त्याअंतर्गत सर्व विनाकारण प्रवास करणे टाळावे असे म्हटले आहे.  गाइडलाइन्समुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कारण त्यांना देश सोडणे संभव नाही आहे. तर 20 फेब्रुवारी पूर्वी उड्डाणे नसल्याने तिकिटांच्या किंमती  जबरदस्त वाढल्या आहेत. दूतवासाने बुधवारी आणखी एक गाइडलाइन्स जाहीर करत विद्यार्थ्यांना असे म्हटले की, फ्लाइट नसल्याने घाबरुन जाऊ नये. दूतवासाने असे म्हटले की, लवकरात लवकर उपलब्ध आणि सुविधाजनक उड्डाणांची बुकिंग करावी.