रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील संघर्ष (Russia Ukraine Crisis) थांबायचे नाव घेताना दिसत नाही. रशियाने यूक्रेनला आक्रमण करण्याची धमकी दिली आहे. तसेच, रशियाच्या फौजा हळूहळू युक्रेनकडे कूच करत असल्याचेही वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या पार्श्वभूीमीवर अमेरिका सतक्र झाली आहे. तसेच, यूक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाला गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, असा इशारा अमेरिका (USA) ने दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी रशियाला इशारा देताना म्हटले की, मास्को क्रेमलिन (Moscow Kremlin) जर काही रचनात्मक पर्यायाची निवड करते तर कूटनीतिसाठी इतर पर्यायही उपलब्ध आहेत.
अमेरिकी राष्ट्रपती भवन व्हाईट हाऊसचचे पंतप्रधान उप प्रेस सचिव कॅरीन जीन पियरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, अमेरिकी संकट कमी करण्यासाठी एक राजकीय तोडगा काढण्याच्या दिशेने सक्रिय रुपात काम करते आहे. जसे की, आपणा सर्वांनाच माहिती आहे की, याच आठवड्यात बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत चर्चा केली. तसेच अमेरिका सहकार्य आणि मदत या मुद्द्यांवर नेहमीच अग्रेसर असल्याचे दाखवूनही दिले. (हेही वाचा, Ukraine Crisis: भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना दूतावासाकडून युक्रेन सोडण्याचा सल्ला)
रशियाने युक्रेनच्या सीमेनजिक सुमारे 100,000 जवान तैनात केले आहेत. रशियाच्या या पावलावर आक्षेप घेत पश्चिमी देशांनी आकोप केला आहे की, युक्रेनवर हल्ला करण्याचा रशियाचा इरादा आहे. मात्र, रशियाने पुन्हा पुन्हा हा आरोप फेटाळत म्हटले आहे की, युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाची कोणतीही योजना नाही. वृत्तसंस्था एफपीने दिलेल्या वृत्तानुसार, क्रेमलिन (रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय) ने संकेत दिले की, सुरक्षेच्या मुद्द्यावरुन ते पश्चिमी देशांशी चर्चा करायला तयार आहेत. ज्यामुळे एक आशा आहे की रशीया इतक्यात तरी युक्रेनवर आक्रमण करणार नाही.