Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 29, 2024
ताज्या बातम्या
39 minutes ago

COVID19: कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी Coro-bot नावाचा प्रायोगिक रोबो ठाण्यामध्ये तयार; पाहा संपूर्ण व्हिडिओ

Videos Ashwjeet Jagtap | Jun 08, 2020 06:51 PM IST
A+
A-

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी (Health Professionals) आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आघाडीवर असणाऱ्या वार्ड बॉईज (Ward-Boys) आणि परिचारिकांसाठी (Nurses) ठाण्यातील (Thane) एका तरुणाने कोरो-बोट नावाचा रोबोट तयार केला आहे. यामुळे रुग्णांपासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. या रोबोटच्या मदतीने कोरोनाबाधित रुग्णांपर्यंत औषध, खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू पोहचवता येणार आहे. तसेच यात ऑटो सेनिटाइजर आणि पेय जलाची सुविधादेखील देण्यात आली आहे.

कोरोना विषाणू थेट तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. यामुळे तुमच्या दोनपैकी एक लक्षण दिसू लागते. एक तर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झाले तरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. मात्र, हा खोकला काही थांबत नाही. असेही होऊ शकतो की, तुम्ही तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात. तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकते. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून प्रतिक तिरोडकर नावाच्या तरुणाने या रोबोटची निर्मिती केली आहे. हे देखील वाचा-Yes Bank मनी लॉन्डींग प्रकरणी ED कडून Cox & Kings कंपनीच्या मुंबई येथील 5 कार्यालयांवर छापा

ट्वीट-

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कोविड19 च्या लसवर संशोधन केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 30 ऱ्हीसस माकडांना (Rhesus Monkeys) पकडण्यास परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय संशोधन करण्यासाठी ऱ्हीसस मकाकस किंवा ऱ्हीसस माकडांचा वापर केला जातो. हे माकड दक्षिण व पूर्व आशियामध्ये आढळतात. वैद्यकीय संशोधन करण्यासाठी एनआयव्हीला चार ते पाच वयोगटातील माकडांची आवश्यकता आहे, अशी माहीती एका वन अधिकाऱ्याने दिली आहे.

 

RELATED VIDEOS