Maharashtra Board Class 10th Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुमची गुणपत्रिका DigiLocker वरून अशी करा डाऊनलोड
DigiLocker च्या अधिकृत वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातूनही महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहता येणार आहे. गुणपत्रिका डाऊनलोड करता येणार आहे.
महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल (Maharashtra Board Class 10th Result) 13 मे 2025 दिवशी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या नऊ विभागांमधील निकाल उद्या जाहीर होणार आहे. बोर्डाची अधिकृत वेबसाईट sscresult.mahahsscboard.in वर पाहता येणार आहे. त्यासोबतच आता DigiLocker वरही उपलब्ध होणार आहे. DigiLocker अॅप आणि वेबसाईट digilocker.gov.in वर पाहता येणार आहे.
वर दहावीची गुणपत्रिका कशी पहाल?
- digilocker.gov.in ही वेबसाईट किंवा अॅप ओपन करा.
- आता तुमचा mobile number/Aadhaar आणि PIN च्या मदतीने लॉगिन करा.
- ‘Education’ या विभागाला भेट द्या.
- ‘Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE)’ चा पर्याय निवडा.
- ‘SSC Marksheet 2025’ निवडा.
- तुमची माहिती एंटर करा आणि डिजिटल मार्कशीट डाउनलोड करा.
यंदा दहावीचा निकाल डिजिलॉकर सोबतच mahresult.nic.in, mahahsscboard.in, results.gov.in, sscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल अवघ्या काही तासांवर; 13 मे दिवशी SMS च्या माध्यमातून कसा बघाल?
डिजिलॉकर वर पहा महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल
📢 Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education Class X Result 2025 will be declared on 13 May at 1 PM.
Check your result on the #DigiLocker Results page:
🔗 https://t.co/izjH9Vdqbj#MSBSHSE #SSCResult2025 #Digitalindia #Maharashtra pic.twitter.com/pFhCvtITtp
— DigiLocker (@digilocker_ind) May 12, 2025
बोर्डाने बारावीचा निकाल 5 मे 2025 दिवशी जाहीर केला आहे. हा निकाल 91.88 % लागला असून मागच्या वर्षीच्या तुलनेत 1.49% कमी लागला आहे. आता विद्यार्थ्यांंचे दहावीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होण्यापूर्वी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्य शिक्षण मंडळ निकालाची आकडेवारी जाहीर करणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 12, 2025 07:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

