Maharashtra Board 10th SSC Result | (File Image)

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board SSC Result)  यंदा 13 मे 2025 दिवशी जाहीर केला जाणार आहे. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education कडून 13 मे दिवशी दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालामध्ये विषयानुसार गुण आणि एकूण टक्केवारी ऑनलाईन निकालात पाहता येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स, काही थर्ड पार्टी वेबसाईट्स यांच्यासोबतच एसएमएस च्या माध्यमातूनही दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

दहावीचा बोर्डाचा निकाल ऑफलाईन पहायचा असेल तर एसएमएस हा एक पर्याय आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स मोबाईल वर एसएमएस च्या माध्यमातून पाहता येणार आहे. नक्की वाचा:  Maharashtra SSC Result 2025 Date: दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली! 13 मे रोजी 'या' वेबसाइटवर तपासा तुमचा निकाल.  

दहावीचा निकाल एसएमएस च्या माध्यमातून कसा पहाल?

  • मोबाईल मध्ये इनबॉक्स उघडा.
  • MHSSC टाईप करून स्पेस देऊन तुमचा सीट नंबर टाका.
  • हा मेसेज 57766 वर पाठवा.
  • निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होताच त्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या मोबाईल फोन वर येईल.

दहावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही असते. पहिल्यांदाच विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देत असल्याने या निकालाची उत्सुकता विशेष असते. यंदा राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आली. एकूण १६,११,६१० विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते, ज्यात ८,६४,१२० मुले, ७,४७,४७१ मुली आणि १९ ट्रान्सजेंडर विद्यार्थी होते. बोर्डाने 5 मे दिवशी यंदा बारावीचे निकाल जाहीर केले आहेत आणि उद्या 13 मे दिवशी दहावीचे निकाल जाहीर होत आहेत.