Result प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात बारावी निकालानंतर (Maharashtra Board HSC Result) आता दहावी बोर्ड परीक्षांचे निकालाची (Maharashtra Board SSC Result) उत्सुकता वाढली आहे. राज्यात यंदा बोर्ड परीक्षा दरवर्षी पेक्षा 10-12 दिवस आधी घेतल्याने निकालही लवकर जाहीर केले जात आहेत. विद्यार्थ्यांना भविष्याच्या आणि करियरच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून लवकर निकाल लावण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न आहे. राज्य शिक्षण मंडळ आणि सरकार कडूनही यंदा 10वी 12वी बोर्ड परीक्षेचे निकाल 15 मे पूर्वी लावण्याचे जाहीर झाल्यानंतर आता 5 मे 2025 ला यंदा 12वीचा निकाल लागला आहे. तर आता 10वीच्या निकालाचे वेध लागले आहेत.

दरवर्षी राज्य शिक्षण मंडळ बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल आठवडाभरामध्ये जाहीर करतात. त्यामुळे 5 मेला यंदा बारावीचा निकाल लागल्यानंतर आठवड्याभरात दहावीचा निकाल देखील जाहीर होऊ शकतो. 12-15 मे 2025 दरम्यान यंदा राज्यात दहावीचा निकाल लागण्याचा अंदाज आहे.

राज्य शिक्षण मंडळाकडून अजून दहावी निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण ती निकालाच्या केवळ एक दिवस आधीच जाहीर होईल. दुसर्‍या दिवशी दुपारी 1 वाजता थेट विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन अधिकृत वेबसाईट्स वर पाहता येणार आहे.

बारावी प्रमाणे दहावीची बोर्ड परीक्षा देखील छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई या नऊ विभागीय मंडळांमध्ये झाली आहे. त्याचे निकाल देखील एकत्रच जाहीर होणार आहेत. दहावीची परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान झाली आहे. दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयांत किमान 35% गुण आवश्यक आहेत. Maharashtra Board SSC Result Date 2025: दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? पहा mahresult.nic.in वर कसा पहाल रिझल्ट.

कसा पहाल दहावीचा निकाल ऑनलाईन?

 

  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेजवर दहावी निकालाच्या लिंक  वर क्लिक करा.
  • आता नव्या विंडो मध्ये तुम्हांला रोल नंबर आणि आईचं पहिलं नाव टाईप करा.
  • सबमीट वर क्लिक करा.
  • निकाल तुमच्या स्क्रिन वर दिसेल.
  • निकालाची तुम्ही प्रिंट आऊट काढून ठेवू शकता.

दहावीच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण दिसणार आहेत. सोबतच एकूण टक्केवारी दिसणार आहे.