
महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा यंदा लवकर पार पडल्यानंतर आता विद्यार्थ्यांना त्यांचे निकालाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा यंदा 15 मे पूर्वी 10वी, 12वीचा निकाल लावण्याचा मानस आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्येच निकाल हाती येण्याचा अंदाज आहे. नुकत्याच राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल (Maharashtra Board SSC Result) मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यामध्ये लागण्याचा अंदाज आहे. दहावीच्या आधी बोर्डाकडून बारावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
बोर्ड परीक्षेच्या निकालाची ठोस तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण दरवर्षीच्या ट्रेंडनुसार, ती तारीख निकालाच्या एक दिवस आधीच घोषित केली जाईल. निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्स वर पाहता येणार आहे. तर ऑफलाईन मध्ये डिजिलॉकर आणि एसएमएस च्या माध्यमातून पाहता येणार आहे. नक्की वाचा: SSC Result Pass Prediction: मुलांच्या तुलनेत मुली सरस, महाराष्ट्र एसएससी निकालाचा ट्रेंड; पाठिमागील 5 वर्षांतील सरासरी उत्तीर्णतेची टक्केवारी, घ्या जाणून .
दहावीचा निकाल पाहण्यासाठी काय हवे?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचं नाव द्यावे लागणार आहे. हा निकाल mahahsscboard.in, mahresult.nic.in, sscresult.mkcl.org या महत्त्वाच्या वेबसाईट वर पाहता येणार आहे.
जाणून घ्या निकाल ऑनलाईन कसा पाहाल
अधिकृत वेबसाइटला भेट द्या: mahresult.nic.in
'SSC Examination Result 2025' या लिंकवर क्लिक करा.
तुमचा दहावीचा सीट नंबर आणि आईचे पहिले नाव एंटर करा.
तुमचे गुण पाहण्यासाठी 'GET RESULT' वर क्लिक करा.
भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्ड डाउनलोड करा किंवा प्रिंट करा.
यंदा राज्यामध्ये दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 दरम्यान झाल्या आहेत. 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये 8 लाख 64 हजार 120 मुले, 7 लाख 47 हजार 471 मुली, तर 19 ट्रान्सजेंडर परीक्षार्थी होते. 5 हजार 130 मुख्य केंद्रांवर राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा पार पडली आहे.