
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) यंदाच्या वर्षी झालेल्या म्हणजेच 2025 च्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC Result) केव्हा लागणार, याबाबत उत्सुकता आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आतुरतेने या निकालाची वाट पाहात आहेत. असे असले तरी, शिक्षण मंडलाने मात्र अद्यापही कोणती तारीख अधकृतपणे जाहीर केली नाही. त्यामुळे हा निकाल काय लागेल, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, यंदाच्या निकालाची प्रतिक्षा असताना पाठिमागील पाच वर्षांमधील विद्यार्थ्यांची या परीक्षेतील कामगिरीवर (SSC Result Pass Prediction) आम्ही एक कटाक्ष टाकला. पाठिमागील पाच वर्षांचे निकाल पाहता विद्यार्थ्यांचे एकूण यश चांगले राहिले आहे. 2019 ते 2023 या काळातील निकाल पाहिल्यास, मुलींनी दरवर्षी मुलांपेक्षा चांगले यश मिळवले आहे.
पाठीमागील पाच वर्षांतील महाराष्ट्र SSC निकालांची सरासरी टक्केवारी आणि मुला-मुलींच्या निकालातील फरक.
महाराष्ट्र SSC निकाल: मागील 5 वर्षांची सरासरी टक्केवारी (2019-2023)
वर्ष | एकूण उत्तीर्ण टक्केवारी | मुलांचा टक्का | मुलींचा टक्का |
2019 | 77.10% | 72.18% | 82.82% |
2020 | 95.30% | 93.90% | 96.90% |
2021 | 99.95%* | 99.96% | 99.96% |
2022 | 96.94% | 96.06% | 97.96% |
2023 | 93.83% | 92.06% | 95.87% |
*टीप: 2021 मध्ये कोविड-19 महामारीमुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती आणि निकाल अंतर्गत मूल्यमापनावर आधारित घोषित करण्यात आला होता. (हेही वाचा, Maharashtra HSC Pass Percentage: महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षा पाच वर्षांतील उत्तीर्णांची टक्केवरी, 2025 चा निकाल कधी? घ्या जाणून)
कामगिरीतील ट्रेंड: मुलींनी दरवर्षी बाजी मारली
मागील पाच वर्षांतील डेटावरून असे स्पष्ट होते की मुलींनी दरवर्षी मुलांपेक्षा अधिक टक्केवारीने यश मिळवले आहे.
- 2019 मध्ये मुलींचा निकाल मुलांपेक्षा तब्बल 10% ने जास्त होता.
- 2023 मध्येही मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 3.81% ने जास्त होती.
- या ट्रेंडवरून स्पष्ट होते की मुली शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उत्तम कामगिरी करत आहेत.
मुख्य मुद्दे:
- 2021 मध्ये विशेष परिस्थितीमुळे जाहीर झालेला सर्वाधिक टक्केवारीचा निकाल (99.95%) होता.
- 2019 चा निकाल सर्वात कमी टक्केवारीचा (77.10%) होता.
महामारीनंतरचे वर्षे (2022 आणि 2023) हे निकालाच्या दृष्टीने सशक्त पुनरागमनाचे संकेत देतात.
दरम्यान, 2019 ते 2023 या पाच वर्षांच्या महाराष्ट्र SSC निकालांचा अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांची प्रगती स्पष्ट दिसते, विशेषतः मुलींची. 2024-2025 च्या परीक्षांची तयारी करताना, हा ट्रेंड भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. पालक, शिक्षक आणि शैक्षणिक धोरणकर्त्यांना अशीच प्रगती भविष्यातही होईल अशी आशा आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे महाराष्ट्रात माध्यमिक (इयत्ता 10 वी) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता 12वी) शिक्षणाचे नियमन आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार आहे. हे मंडळ त्याच्याशी संलग्न शाळांमध्ये परीक्षा आयोजित करते, अभ्यासक्रम निश्चित करते आणि दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करते.