अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडी (ED) ने येस बँक मनी लाँड्रींग प्रकरणात (Yes Bank Money Laundering Case) कॉक्स अॅण्ड किंग्ज कार्यालयांवर छापा टाकला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (Money Laundering Prevention Act) अंतर्गत कारवाई करत कॉक्स अँड किंग्ज कंपनीच्या मुंबई येथील पाच कार्यालयांवर छापेमारी केली. ही कंपनी येस बँकेच्या एका प्रमुख कर्जदारांपैकी एक म्हणून ओळखली जाते. येस बँकेने या कंपनीस सुमारे 2,260 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.
गैरव्यवहार शोधून काढणे तसेच या प्रकरणाशी संबंधित अधिकाधिक पुरावे गोळा करण्याच्या हेतून या कार्यालयांवर ईडीने छापेमारी केल्याचे समजते. एका कथित गौरव्यवराह आणि फसवणूक प्रकरणाची ईडी तपास करत आहे. या प्रकरणात येस बँक आणि अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असल्याच्या संशय आहे. बँकेने ज्या कंपन्यांना कर्ज दिले ती रक्कम बरीच मोठी असून त्यातील बहुतांश प्रकरणे ही एनपीएमध्ये गेली आहेत. येस बँक सह-संस्थापक राणा कपूर यांना याच प्रकरणात मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यांची मुंबईतील पीएमएलए न्यायालयासमोर चौकशी सुरु आहे. (हेही वाचा, Yes Bank Crisis: येस बँक, म्यूचुअल फंड, गुंतवणूकदार आणि संभ्रमीत ग्राहक यांबाबत अभ्यासकांचा दृष्टीकोन काय?)
येस बँक ही प्रदीर्घ काळापासून खासगी क्षेत्रातील एक महत्त्वाची आणि ताकदवान बँक म्हणून ओळखली जाते. परंतू मधल्या काळात अशा काही घडामोडी (आर्थिक) घडल्या की एस बँक अडचणीत आली बँक व्यवस्थापनाने अशा अनेक कंपन्यांना कर्ज दिले ज्या कपन्यांनी त्या कर्जाची परतफेडच केली नाही. त्यामुळे बँकेच्या ताळेबंदात मोठा नकारात्मक परिणाम झाला.
ट्विट
Yes Bank case: ED searches five offices of Cox & Kings in Mumbai
Read @ANI Story | https://t.co/Vv93d8qPO4 pic.twitter.com/IZf4fCm9th
— ANI Digital (@ani_digital) June 8, 2020
दरम्यान, एस बँकेने ज्या कंपन्यांना कर्ज दिले त्यात IL&FS, दीवान हाउसिंग फाइनांन्स, जेट एयरवेज, कॉक्स एंड किंग्स, CG पावर, कॅफे कॉफी डे, अल्टिको अशा कंपन्यांचा समावेश आहे. येस बँकेने जे काही कर्जवाटप केले आहे. त्यातील बहुतांश कर्ज याकंपन्यांनीच घेतले आहे. ज्यातील बहुतांश कर्ज एनपीएमध्ये गेले आहे.