दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी आज सकाळी सीबीआयची टीम पोहचली आहे. सीबीआयच्या कारवाई नंतर सिसोदीया यांनी काही ट्वीट करत 'स्वागत आहे’ असे म्हंटले आहे. मी सीबीआयचे स्वागत करतो. तपासात मी पूर्ण सहकार्य करणार आहे. जेणेकरुन सत्य लवकरच बाहेर येईल, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे.