Delhi Liquor Scam: दिल्ली हायकोर्टाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर तुरुंगातून बाहेर आले मनीष सिसोदिया; आजारी पत्नीला भेटण्यासाठी पोहोचले निवासस्थानी
Manish Sisodia (PC - ANI/Twitter)

Delhi Liquor Scam: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) काही महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. अबकारी धोरण प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या मनीष सिसोदिया यांची पत्नी आजारी आहे. न्यायालयाने आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी आणि तिची प्रकृती विचारण्यासाठी दिवसभराची परवानगी दिली आहे. मनीष सिसोदियो यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तेव्हापासून मनीष सिसोदिया यांना अनेकदा अर्ज करूनही जामीन मिळू शकला नसून ते तुरुंगात आहेत.

जामीन न मिळाल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना 7 तासांसाठी घरी जाण्याची परवानगी दिली आहे. आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ते पत्नीसोबत त्यांच्या घरी असतील. यानंतर मनीष सिसोदिया यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा जामीन न मिळाल्याने त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. (हेही वाचा -Employees Advance Salary: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अॅडव्हान्स पगार; देशात पहिल्यांदाच लागू करण्यात आली अशी प्रणाली)

मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर विचार करण्यासाठी न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना त्यांच्या पत्नीचे वैद्यकीय रेकॉर्ड दाखल करावे, असे सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मनीष सिसोदिया पोलीस कोठडीत असताना त्यांच्या घरी राहणार असून पत्नीला भेटणार आहेत. या दरम्यान ते आपल्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला भेटू शकत नाही. तसेच, त्यांना इंटरनेट वापरण्याची किंवा मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही.

दिल्लीच्या अबकारी धोरणाशी संबंधित कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी केल्यानंतर मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून तो सीबीआय आणि ईडीच्या ताब्यात आहे. त्यांनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला. पण प्रत्येक वेळी त्याचा जामीन अर्ज फेटाळला गेला.