Money | (Photo Credit - Twitter)

Employees Advance Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना आता अॅडव्हान्स पगाराचा (Advance Salary) लाभ घेता येणार आहे. देशात प्रथमच ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. सरकारने आगाऊ पगाराची (Rajasthan Government) घोषणा केली आहे. राजस्थान सरकारने ही घोषणा केली आहे. अशोक गेहलोत सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पदोन्नती वाढवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. नवीन प्रणाली लागू करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे, याआधी देशातील कोणत्याही राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन देऊ केले नव्हते. या व्यवस्थेअंतर्गत राज्य कर्मचारी त्यांच्या पगारातील अर्धा भाग आगाऊ घेऊ शकतील.

राजस्थान सरकारने म्हटले आहे की, या अंतर्गत एकावेळी जास्तीत जास्त 20,000 रुपये अॅडव्हान्स घेता येतील. सरकारी कर्मचाऱ्यांना हा लाभ देण्यासाठी वित्त विभागाने बिगर बँकिंग वित्त कंपनीशी करार केला असून आगामी काळात आणखी काही बँका आणि वित्तीय संस्थांसोबत करार केला जाणार आहे. (हेही वाचा - Option For 2000 Rupees Exchange: दोन हजारांची नोट बदलण्यासाठी नागरिकांची शक्कल, बँकेत गर्दी टाळण्यासाठी पेट्रोल पंप, स्वीगी, झोमॅटोसह इतर पर्यायांचा वापर)