Manish Sisodia (Photo Credits: PTI)

आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजूर केला आहे. Excise Policy Case मध्ये ED, CBI कडून अटकेत असलेले मनीष सिसोदिया मागील 17 महिन्यांपासून तुरूंगात आहेत. सिसोदियांना 26 फेब्रुवारी 2023 ला सीबीआय ने आणि नंतर 9 मार्चला ईडीने अटक केली होती. तेव्हापासून त्यांची रवानगी दिल्लीत तिहार जेल मध्ये करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयामध्ये Justices BR Gavai आणि KV Viswanathan यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने, 'सुमारे 17 महिन्यांचा तुरुंगवास आणि खटला सुरू न झाल्यामुळे, याचिका कर्त्याला जलद सुनावणीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचे' मत नमूद केले आहे. 'या प्रकरणातील 400 हून अधिक साक्षीदार आणि हजारो कागदपत्रे आहेत हे लक्षात घेऊन नजीकच्या काळात खटला पूर्ण होण्याची फारशी शक्यता नाही. अशा परिस्थितीत सिसोदिया यांना ताब्यात ठेवल्यास कायद्यानुसार वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे गंभीर उल्लंघन होईल. ' असं सांगत त्यांनी जामीन मंजूर केला आहे. Liquor Policy Scam Case: मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका; दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन. 

मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर

आप नेते संजय सिंहा यांनी व्यक्त केला आनंद

Excise Policy Case मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेले मनीष सिसोदिया हे संजय सिंह यांच्यानंतरचे दुसरे आप नेते आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, ते सध्या सीबीआयच्या कोठडीत असल्याने जेल मध्ये आहेत.