Delhi Liquor Policy Case: आम आदमी पक्षाचे (AAP) नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सोमवारी न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) तीन दिवसांचा अंतरिम जामीन (Interim Bail) मंजूर केला आहे. लखनौमध्ये भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सिसोदिया यांना दिल्ली न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात दिलासा देत सिसोदिया यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. राऊस अव्हेन्यू कोर्टाने 14 फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया यांच्या लखनौमध्ये भाचीच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन मागणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. (हेही वाचा -Manish Sisodia Bail Application: मनीष सिसोदिया यांनी राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केली जामीन याचिका)
दरम्यान, सोमवारी दुपारी 4 वाजता दिल्ली कोर्टाने आप नेत्याला मोठा दिलासा देत तीन दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मनीष सिसोदिया 14 फेब्रुवारीला लखनऊमध्ये आपल्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी, 5 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने सिसोदिया यांना अटकेत असताना आठवड्यातून एकदा त्यांच्या अस्वस्थ पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती. (हेही वाचा - Manish Sisodia Excise Policy Scam: मनीष सिसोदिया एव्ह्न्यू कोर्टात हजर; CBI ने मागितला पाच दिवसांचा रिमांड)
Delhi court grants interim bail to AAP leader Manish Sisodia from February 13 to 15 in excise policy case to attend niece's wedding. pic.twitter.com/NF3Dc6bOgm
— Press Trust of India (@PTI_News) February 12, 2024
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आली अटक -
मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी रोजी अबकारी धोरणाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. सीबीआयने त्याच्या अटकेनंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांची चौकशी केली होती.