Manish Sisodia, K Kavitha (PC - Facebook)

Delhi Excise Policy Case: दिल्ली दारू धोरण प्रकरणात (Delhi Excise Policy Case) न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia), बीआरएस नेत्या के. कविता (K Kavitha) यांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) 31 जुलैपर्यंत वाढ केली आहे. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टा (Rouse Avenue Court) ने मनीष सिसोदिया आणि इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. मनीष सिसोदिया आणि के कविता दिल्ली दारू घोटाळ्यात तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले.

मनीष सिसोदिया आणि के कविता यांना त्यांच्या पूर्वीच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. गेल्या सुनावणीत दोघांच्या न्यायालयीन कोठडीत 26 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्याचवेळी न्यायालयाने बीआरएस नेत्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली होती. (हेही वाचा - Delhi Excise Policy Case: अरविंद केजरीवाल यांच्या नियमित जामिनाला आव्हान देणाऱ्या ईडीच्या याचिकेवर उच्च न्यायालयात 7 ऑगस्टला सुनावणी)

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. सिसोदिया यांचा नियमित जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने दोनदा फेटाळला आहे आणि तिसऱ्यांदा सिसोदिया यांचा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. (हेही वाचा - Delhi Liquor Policy Case: अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; दिल्ली दारू धोरण प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय)

दरम्यान, के. कविता यांची प्रकृतीही खालावली होती. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी गेल्या गुरुवारी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी (एम्स) येथे पाठवण्यात आले होते. याआधी तीव्र तापामुळे कविताला दीनदयाल उपाध्याय (डीडीयू) रुग्णालयात नेण्यात आले होते.