Delhi Liquor Policy Case: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी राऊस अव्हेन्यू कोर्टाने 14 दिवसांसाठी (12 जुलैपर्यंत) न्यायालयीन कोठडीत पाठवले. सीबीआयने केजरीवाल यांना 26 जून रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणात तिहार तुरुंगातून अटक केली होती. त्यानंतर 3 दिवसांच्या कोठडीनंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सीबीआयने न्यायमूर्ती सुनैना शर्मा यांच्या न्यायालयात केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली, जी न्यायालयाने मान्य केली.

केजरीवाल यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. पहिला ईडीचा आहे, ज्यामध्ये त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. दुसरा गुन्हा सीबीआयचा आहे, जो दारू धोरणातील भ्रष्टाचाराबाबत नोंदवला गेला होता. दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्हे स्वतंत्रपणे नोंदवण्यात आले आहेत. ईडी प्रकरणातील केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 3 जुलै रोजी संपत आहे. (हेही वाचा: चंद्रशेखर आझाद यांनी विचारला प्रश्न, कांवड यात्रेसाठी रस्ते आणि रुग्णालये बंद असू शकतात, मग ईदच्या नमाजला आक्षेप का?)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)