Vivo Smartphone Launched (Photo Credits: Vivo)

Vivo X60 स्मार्टफोन संबंधित गेल्या काही दिवसांपासून नव्या गोष्टींचा खुलासा करण्यात येत आहे. अशातच कंपनीने हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्याची तयारी केली आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, ग्लोबल मार्केटसह Vivo X60 सीरिज भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. याचा खुलासा भारतातील सर्टिफिकेशन साइट बीआयएस यांनी केला आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी Vivo X60, X60 Pro, X60 Pro+ लॉन्च करणार आहे.(Xiaomi Redmi 9 Prime: शाओमी कंपनीचा 5 कॅमेरा असलेल्या बजेट स्मार्टफोन रेडमी 9 प्राईम झाला आणखी स्वस्त!)

91Mobiles च्या रिपोर्ट्स नुसार, Vivo X60 काही सर्टिफिकेशन साइट्सवर स्पॉट करण्यात आला आहे. मात्र आता स्मार्टफोन BIS वर सुद्धा लिस्ट केला गेला आहे. त्यामुळे हे स्पष्ट होते की, भारतीय युजर्सला या स्मार्टफोनसाठी अधिक वेळ वाट पहावी लागणार नाही आहे. मार्ट महिन्याच्या अखेर पर्यंत हा स्मार्टफोन लॉन्च केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण कंपनीकडून त्याच्या लॉन्चिंग तारखेबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर Vivo X60 Pro+ हे स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये आधीच लॉन्च करण्यात आले आहेत.

विवो कंपनीने गेल्या डिसेंबर मध्ये चीनमध्ये आपला प्रीमियम डिझाइन आणि हाय अॅन्ड फिचर्स पेक्षा लैस असलेला स्मार्टफोन Vivo X60 Pro+ लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.59 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. हा फोन Eyxnos 1080 चिपसेटवर काम करणार आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी 4200mAh ची बॅटरी दिली गेली आहे. तसेच 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे.(Facebook ने ऑस्ट्रेलिया मध्ये बंद केली न्यूज सर्व्हिस; अनेक Emergency Services Accounts देखील बंद)

या स्मार्टफोनच्या पॉवर बॅकअप बद्दल बोलायचे झाल्यास 4200mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सुद्धा दिला गेला आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये चार रियर कॅमेरा दिला असून फोनचा प्रायमरी सेंसर 48MP आहे. अशी अपेक्षा आहे की, कंपनी Vivo X60 Pro+ च्या अंतर्गत Vivo X60 मध्ये सुद्धा पॉवरफुल बॅटरी आणि शानदार परफॉर्मेन्सची क्षमता असू शकते. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो.