Xiaomi Redmi 9 Prime: स्मार्टफोन निर्माता शिओमीने (Xiaomi) आपला रेडमी 9 प्राइम (Redmi 9 Prime) स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच केला होता. सुरुवातीलाच हा स्मार्टफोन कमी किंमतीत लॉन्च झाला होता. मात्र, या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत आणखी घट झाल्याची माहिती समोर येत आहे. या फोनमध्ये कंपनीने क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. नवीन किंमतीसह हा फोन शाओमीच्या अधिकृत वेबसाईट (MI.Com) आणि ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन च्या वेबसाइटवर लिस्ट झाला आहे.
रेडमी 9 प्राइमच्या (4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज) व्हेरिअंटच्या किंमतीत 500 रुपयांची कपात झाली आहे. या स्फार्टफोनची किंमत 9 हजार 499 रुपये झाली आहे. याशिवाय, (4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज) व्हेरिअंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर हा फोन आता 11 हजार 999 रुपयांऐवजी 10 हजार 999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. हे देखील वाचा- Redmi 9 Power अखेर भारतात लाँच, 6GB रॅमसह काय आहेत याची खास वैशिष्ट्ये?
या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल-एचडी + आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 वापरण्यात आला आहे.रॅम, स्टोरेज आणि प्रोसेसर: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, मीडियाटेक हेलिओ जी 80 ऑक्टा-कोर प्रोसेसरमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंतचा स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो.
तसेच स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. त्यासह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल डीप्थ कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.