Redmi 9 Power अखेर भारतात लाँच, 6GB रॅमसह काय आहेत याची खास वैशिष्ट्ये?
Redmi 9 Power (Photo Credits: Twitter)

गेल्या काही दिवसांपासून Xiaomi कंपनीचा भारतीय बाजारात येणा-या नव्या स्मार्टफोनची उत्सुकता लागली होती. ती उत्सुकता आता संपली असून आज भारतात Redmi 9 Power स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला. या स्मार्टफोनचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 6GB RAM+128GB स्टोरेज देण्यात आले आहे. याआधी डिसेंबर 2020 मध्ये हा स्मार्टफोन 4GB रॅम स्टोरेजसह लाँच करण्यात आला होता. मात्र आता या स्मार्टफोनची बाजारातील क्रेझ पाहता एक पाऊल पुढे टाकत यात 6GB रॅमसह लाँच करण्यात आला आहे.

Redmi 9 Power चा या 6GB रॅम असलेल्या वेरियंटची किंमत 12,999 रुपये अतकी आहे. हा स्मार्टफोन 4 रंगात उपलब्ध आहे. निळा, हिरवा, लाल आणि काळा असे चार पर्याय यात देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन Amazon, Mi.com, Mi Homes आणि Mi Studios येथून खरेदी करु शकता.हेदेखील वाचा- काय सांगता! Xiaomi कंपनी आपली पहिली कार लाँच करण्याच्या तयारीत, ऑटोमोबाईल जगतात होणार धमाकेदार एन्ट्री

Redmi 9 Power च्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.53 इंचाची पुर्ण HD+ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन सुद्धा दिले आहे. हा स्मार्टफोन ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरसह येतो. यात 6GB रॅम आणि 128GB चे स्टोरेज देण्यात आले आहे.

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, याक 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा एक आणि 2MP चा दोन सेंसर दिले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित MIUI 12 वर काम करतो. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा फोन 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या बाजूला देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी Redmi 9 Power मध्ये 4G VoLTE, ड्यूल-बँड वायफाय, ब्लूटुथ v5.0, GPS/A-GPS, USB टाइप-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आले.