भारतात यंदा दिवाळी (Diwali) सणाच्या सेलिब्रेशन मध्ये सूर्य ग्रहण (Surya Grahan) देखील आले आहे. यंदाच्या वर्षातलं शेवटचं सूर्य ग्रहण 25 ऑक्टोबर 2022 दिवशी आहे. अवकाशीय घटनांचे कुतुहल असणार्यांना ग्रहण अनुभवणं ते पाहणं या सार्या गोष्टी अकस्मित करणार्या वाटतात. त्यांंना याबाबत उत्सुकता असते पण धार्मिक मान्यता पाळणारे आणि त्यांच्या रीतीभाती नुसार कोणतेही ग्रहण असल्यास त्यावेळी देवदर्शन टाळलं जाते, आजारी व्यक्ती, लहान मुलं आणि गरोदर स्त्रिया विशेष काळजी घेतात. ग्रहणाच्या वेळेनुसार वेध पाळण्याचा वेळ (Vedha Timings), सुतक काळ (Sutak Kal Timing) पाळला जातो आणि या काळात थोडी अधिक सजग राहून काळजी घेतली जाते. मग यंदा दिवाळीच्या धामधूमीत आलेले ग्रहण तुम्ही पाळणार असाल तर पहा या ग्रहणाचा सूतक काळ काय आहे? ग्रहण किती वाजता आणि कुठे दिसणार आहे?
सूर्यग्रहण 2022 चा सुतककाळ
द्रिक पंचांगच्या माहितीनुसार, भारतामध्ये दिसणार्या 25 ऑक्टोबरच्या सूर्यग्रहणात सुतक काळ हा पहाटे 3 वाजून 16 मिनिटांनी सुरू होणार आहे तर संध्याकाळी 5 वाजून 42 मिनिटांनी संपणार आहे. सूर्य ग्रहणात हा सुतक काळ ग्रहणापूर्वी 12 तास आधी पाळला जातो. आजारी व्यक्ती, वयोवृद्ध यांच्यासाठी हा सुतककाळ दुपारी 12 वाजून 05 मिनिटांनी सुरू होणार आहे तर संध्याकाळी तो 5 वाजून 42 मिनिटांनी संपणार आहे. हिंदू धर्मियांची अशी धारणा आहे की सूर्य ग्रहणातील हा सुतक काळ अशुभ मानला जातो. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, औरंगाबाद मधील ग्रहणाच्या वेळा पहा इथे!
मुंबईत हे ग्रहण संध्याकाळी 4.49 वाजता सुरू होईल. पण ग्रहण संपण्याआधीच संध्याकाळी 6.08 ला सूर्यास्त होणार आहे. त्यामुळे ग्रहणातच सूर्यास्त होताना पहायला मिळणार आहे. भारतामध्ये प्रत्येक शहरागणिक सूर्यास्ताच्या वेळांनुसार हा ग्रहणाचा कालावधी देखील कमी-जास्त असणार आहे. सूर्यग्रहण भारतामध्ये गुजरातच्या द्वारका मध्ये सर्वाधिक वेळ म्हणजे 1 तास 45 मिनिटे दिसणार आहे. तर पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे हे ग्रहण सर्वात कमी वेळासाठी म्हणजे फक्त 12 मिनिटांसाठी दिसणार आहे. पण हे ग्रहण पाहताना डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. हे ग्रहण थेट डोळ्यांनी पाहणं टाळणं गरजेचे आहे. योग्य उपकरणांच्या मदतीनेच ग्रहण पहाणं हितावह आहे.
भारतामध्ये उत्तर-पश्चिम भागात जास्तीत जास्त ग्रहणाच्या वेळी चंद्राद्वारे सूर्य अंदाजे 40 ते 50 झाकोळला जाईल. हे प्रमाण इतर भागात कमी असेल.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.