Solar Eclipse 2022 Indian Superstitions (File Image)

यावर्षी दिपोत्सवावर (Dipotsav) ग्रहणाची सावली पडणार आहे. कारण लक्ष्मीपूजनाच्या (Lacmi Pujan) दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी भारतात (India) खंडग्रास सुर्यग्रहण (Solar Eclips) दिसणार आहे. भारताप्रमाणेचं हे सुर्यग्रहण युरोप(Europe), मध्य पूर्व (Middle East), आफ्रिकेचे उत्तर-पूर्व भाग (Africa North East), पश्चिम आशिया (West Asia), उत्तर अटलांटिक महासागर (North Atlantic Ocean) आणि उत्तर हिंद महासागर (North Indian Ocean) या प्रदेशात दिसणार आहे. तरी सुर्यास्तापूर्वी (Sunset) हे सुर्यग्रहण भारतातील विविध शहरात वेगवेगळ्या वेळात दिसणार आहे. तरी नागरिकांनी हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असं तज्ञांनी सांगितलं आहे. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघितल्यास डोळ्याचे गंभीर नुकसान होवू शकते,असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी होते जेव्हा चंद्र (moon) पृथ्वी (earth) आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तीन वस्तू एका संरेखित केल्या जातात. जेव्हा चंद्र सौर डिस्कला अर्धवट झाकतो तेव्हा आंशिक सूर्यग्रहण होते.

 

दिवाळीनंतर (Diwali) 25 ऑक्टोबरला (October) मंगळवारी (Tuesday) सूर्यग्रहण (solar eclips) होणार आहे. पंचांगनुसार हे ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण आहे. भारतात (India) हे सुर्यग्रहण दुपारी 04:29 पासून  संध्याकाळी 05:42 वाजता पर्यत दिसणार आहे. भारतात नवी दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), बेंगळुरू(Banglore), कोलकाता (Kolkata), चेन्नई (Chennai), अहमदाबाद (Ahmedabad), वाराणसी (Varanasi), मथुरा (Mathura), पुणे (Pune), सुरत (Surat), कानपूर (Kanpur), विशाखापट्टणम, पटणा (Patna), उटी, चंदीगड (Chandigarh) यासह देशातील जवळपास सर्व भागांमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसेल. (हे ही वाचा:-)

 

खंडग्रास सूर्यग्रहण गुजरातच्या द्वारकामध्ये सर्वाधिक वेळ म्हणजे 1 तास 45 मिनिटे दिसणार आहे. तर पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे हे ग्रहण स्रवात कमी वेळासाठी म्हणजे फक्त 12 मिनिटांसाठी असेल. तसेच देशाची राजधानी दिल्ली आणि राज्याची राजधानी मुंबईमध्ये हे सुर्यग्रहण अनुक्रमे 1 तास 13 मिनिटे आणि 1 तास 20 मिनिटे दिसणार आहे. सूर्यास्तानंतर ग्रहणाचा शेवट भारतातून दिसणार नाही.