Draconid Meteor Shower (Photo Credits: File Image)

Draconid Meteor Shower 2020 Dates in India: ऑक्टोंबर महिना हा अवकाश प्रेमींसह शोधकर्त्यांसाठी महत्वाचा असणार आहे. कारण महिन्याच्या सुरुवातीलाच हार्वेस्ट मून दिसून असून अखेरीसुद्धा पूर्ण चंद्र पहायला मिळणार आहे. त्याचसोबत एक दिवस अगोदर तब्बल 15 वर्षानंतर मंगळ ग्रह हा पृथ्वीच्या जवळ आल्याचे समोर आले आहे. या अशा सर्व गोष्टींमुळे ऑक्टोंबर महिना स्पेशल असून आता दोन उल्का वर्षा होणार आहेत. त्यामधील पहिली उल्का वर्षा जी सध्या अॅक्टिव्ह असून त्याला Draconid Meteor Shower असे नाव दिले गेले आहे. ही उल्का वर्षा 8 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर दरम्यान होणार असल्याचे दिसून येणार आहे. त्यामुळे आज तुटता तारा पाहण्याची उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहे. तर येथे जाणून घ्या तुम्ही ही उल्का वर्षा कधी, कुठे आणि कशा पद्धतीने आज रात्री पाहू शकता.

>>Draconid Meteor Shower 2020 तारीख

ड्रॅकोनिड उल्का वर्षा ही 6 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर पर्यंत अॅक्टिव्ह असणार आहे. ही उल्का वर्षा 7 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबरच्या रात्री दिसून येणार आहे.(Venus Is A Russian Planet? शुक्र हा रशियन ग्रह असल्याचा रशिया स्पेस एजन्सीचा दावा, वाचा सविस्तर)

>>Draconid Meteor Shower म्हणजे काय?

Draconid तुटणाऱ्या तारांचे नाव Draco तारामंडळाच्या नावावरुन ठेवले आहे. जेव्हा पृथ्वी Giacobini-Zinner कॉमेंट मधून जाते तेव्हा ते तयार होतात. खरंतर तुटणारे तारे हे पहाटेच्या वेळी दिसून येतातय पण ड्रॅकोनिक हे संध्याकाळी नीट पहायला मिळतात. ते 8-9 ऑक्टोंबर दरम्यान दिसणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(Asteroid 2020ND: पृथ्वी जवळून जाणार London Eye पेक्षाही दीडपट मोठा लघुग्रह; नासा ने दिला इशारा)

>>कसे आणि कुठे पहाल Draconid Meteor?

ही उल्का वर्षा उत्तर गोलार्थाच्या बाजूने असल्याने ती भारतात सुद्धा पहायला मिळणार आहे. ड्रॅकोनिक उल्का वर्षा पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण रात्र जागे राहण्याची गरज नाही आहे. तर हे ड्रॅकोनिक संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला सहज पाहता येणार आहेत. म्हणजेच Dawn होण्यापूर्वी ते तुम्हाला दिसू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर ही उल्का वर्षा पहायची असल्यास जसजसा काळोख पडण्यास सुरुवात होईल तसे तुम्ही आकाशाचे निरिक्षण करा. पण शहरातील लाईट्स आणि उजेड ज्या ठिकाणी जास्त नसेल तेथे तुम्हाला उल्का वर्षा अगदी सहज पाहता येणार आहे.

जर तुम्हाला आजची उल्का वर्षा पाहता आली नाही तर आजपासून येणाऱ्या आठवड्यात दुसरी Orionids पाहता येऊ शकणार आहे. खगोलशास्रज्ञ हे ड्रॅकोनिक उल्का वर्षा ही अन्य वार्षिक अवकाशातील काही गोष्टींप्रमाणे अधिक मनोरंजक असल्याचे मानत नाहीत.