जगात सध्या काही देशांंमध्ये सीमा प्रश्न (Border Question) अगदी ऐरणीवर आले आहेत. अशावेळी रशियाने (Russia) मात्र पृथ्वी वरचे सीमावाद पार मागे टाकुन थेट शुक्र (Planet Venus) ग्रहावर आपला हक्क असल्याचा दावा केला आहे. CNN च्या वृत्तानुसार, रशियन स्पेस एजन्सीचे (Russian Space Agency) प्रमुख दिमित्री रोगोजिन (Dimitri Rogojin) यांंनी मॉस्को (Moscow) येथील एका औद्योगिक प्रदर्शनात भाषणाच्या वेळी शुक्राचा रशियन ग्रह असा उल्लेख केला होता. तसेच आपण लवकरच शुक्रावर यान पाठवणार आहोत यासाठी सध्या व्हीनर डी मोहिम पाठवण्याचा विचार आहे तसेच येत्या दिवसात अमेरिकेच्या नासा (NASA) सोबत मिळुन नवी मोहिम आखण्याचा सुद्धा मानस आहे असे रोगोजिन यांंनी सांंगितले. Solar Cycle 25 Begins: सुरु झाले 25 वे सौर चक्र; जाणून घ्या काय होऊ शकेल याचा परिणाम
मॉस्कोमध्ये हेलीरशिया 2020 या कार्यक्रमामध्ये रोगोजिन यांनी म्हंंटले की, “शुक्रावर जाण्याचा आमचा विचार आहे,शुक्र हा रशियन ग्रह आहे असं आम्ही मानतो,रशियन अंतराळ संशोधन संस्थेच्या 2021-30 च्या दहा वर्षांच्या अवकाश मोहिमांच्या कार्यक्रमांमध्ये शुक्र मोहिमेचा समावेश आहे." अलिकडेच पृथ्वीवर आढळणारा फॉस्फीन वायु शुक्राच्या जवळील वातावरणात आढळुन आला होता त्यानंंतर लगेचच रशियाने शुक्र मोहिमेची घोषणा केली आहे.(Farthest Galaxy of Stars in the Universe: भारतीय संशोधकांनी पृथ्वीपासून 9.3 बिलियन प्रकाशवर्ष दूर असलेल्या नव्या आकाशगंगेचा लावला शोध)
शुक्र ग्रहावर जीवसृष्टी असण्याचा सुद्धा अंदाज खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे,कार्डीफ विद्यापिठातील प्राध्यापक जेन ग्रेव्हिएस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्र ग्रहावरील वातावरणाच्या केलेल्या अभ्यासात फॉस्फीन आढळल्याने पाण्याचा अंक्ष असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, रशियन अंतराळसंस्था 1967 ते 1984 च्या कालावधीमध्ये शुक्र ग्रहाबाबत संशोधन करण्यात आघाडीवर होती त्यामुळे या संशोधनावर आधारित पुरावे शोधण्यासाठी शुक्र मोहिम राबवली जाणार आहे.