Photo Credits: @giopagliari/ @Cmdr_Hadfield/ Twitter)

Mars Made Its Closest Approach to Earth: ऑक्टोबर महिना हा अनेक गोष्टींसाठी खास आहे. या महिन्यात नवरात्रीचा उत्सव आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे. तर यासोबतच खगोलप्रेमींना हा महिनाभर अगदी घरबसल्या मंगळ दर्शन करता येणार आहे. 6 ऑक्टोबरला यंदा मंगळ (Mars) ग्रह पृथ्वीच्या (Earth) अगदी जवळ आला आहे. दरम्यान 2003 नंतर तब्बल 15 वर्षांनंतर अशाप्रकारे अगदी जवळून मंगळ दर्शनाचा योग आला आहे. रिपोर्ट्सनुसार मंगळ आणि पृथ्वीमधील अंतर 38.6 मिलियन मील आहे. अशाप्रकारे पुन्हा अनुभव 2035 मध्ये घेता येणार आहे.

मंगळाचं अगदी जवळून दर्शन घेता येणार असल्याने अनेक खगोलप्रेमींनी कालपासूनच या अदभूत नजार्‍याला न्याहाळायला सुरूवात केली आहे. तसेच त्याचे काही खास फोटो सोशल मीडियामध्ये पोस्ट देखील केले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात रात्री मंगळ ग्रह आकाशात दिसणार आहे. 13 ऑक्टोबरला अशी स्थिती निर्माण होणार आहे ज्यामध्ये मंगळ एका बिंदूवर असेल. जेव्हा पृथ्वी सरळ सूर्य आणि मंगळ यांच्या मध्ये असेल या स्थितीत तो अधिक चमकणार आहे. सूर्यास्तापर्यंत त्याची चमक वाढेल. अशा प्रकारची स्थिती दर 26 महिन्यांनी एकदा होते.

रात्रीच्या काळोखामध्ये मंगळ ग्रह थेट डोळ्यांनी अगदी सहज पाहता येणार आहे. यामध्ये मध्यरात्रीपर्यंत तुम्ही जागणार असाल तर तो अधिक प्रखर पाहता येईल यासाठी तुम्हांला केवळ आकाशामध्ये दक्षिणेकडेच्या भागाला पहायचं आहे.