जगभरात 2020 हे वर्ष मोठ्या आव्हानांचं आहे. एकीकडे कोरोना व्हायरस या जागतिक आरोग्य संकटाचा सामाना करत असताना आता अवकाशातही मोठ्या घटना घडत आहेत. दरम्यान आता नासा या अमेरिकेच्या संस्थेने एक नवी माहिती जारी केली आहे. त्यानुसार, पृथ्वीजवळून मोठ्या आकाराचा एक asteroid वेगाने पुढे जाणार आहे. दरम्यान त्याचा आकार हा लंडन आय पेक्षाही दीड पट अधिक आहे. दरम्यान युनायटेड किंग्डम मधील लॅन्डमार्क असणार्या लंडन आयची उंची 443 फीट आहे. आता यापेक्षा मोठा asteroid पृथ्वीजवळून जाणार आहे.
नासा या अमेरिकन स्पेस एजंसीने याला Asteroid 2020ND असं नाव दिलं आहे. 24 जुलै 2020 दिवशी हे Asteroid पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येऊ शकतं. नासाच्या अंदाजानुसार हे पृथ्वीच्या 0.034 AU (Astronomical unit) इतपत आतमध्ये येण्याचा धोका आहे. एक एस्ट्रोनॉमिकल यूनिट 150 मिलियन किलोमीटर इतके असते. म्हणजे अंदाजे हे अंतर पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान जितके आहे तितके आहे. Asteroid 2020ND मुळे मोठा धोका अद्याप ठोस वर्तवण्यात आलेला नाही. नासा संशोधक सातत्याने त्याच्या प्रवासाचं ट्रॅकिंग करत असतात.
दरम्यान एप्रिल महिन्यात देखील अशाच प्रकारे Asteroid 1998 OR2 पृथ्वीजवळून गेला होता. अशाप्रकारे पृथ्वीच्या आजुबाजूने लहान- मोठे Asteroid जात असतात. दरम्यान नासाने दिलेल्या या नव्या asteroid च्या माहितीनंतर सोशल मीडियात युजर्सनी देखील आपल्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.