Moon (Photo Credits: Pixabay)

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला म्हणजे 1 ऑक्टोबरला तुम्ही पौर्णिमेचा चंद्र पाहिला आहे. पण या महिन्यात दुसरा पौर्णिमेचा चंद्र कोजागिरी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबरला दिसणार आहे. हा 31 ऑक्टोबरचा पौर्णिमेचा चंद्र ब्लू मुन (Blue Moon ) म्हणून ओळखला जातो. जगभरात 31 ऑक्टोबरला हा ब्लू मुन पाहता येणार आहे. दरम्यान यापूर्वी 2018 साली अशाप्र्कारे ब्लू मुन दिसला होता आणि पुढील ब्लू मुन आता थेट 2023 साली दिसणार आहे. त्यामुळे तुम्हांला अवकाशात दिसणार्‍या, घडणार्‍या अशा काही अद्भूत घटनांचं तुम्हांलाही अप्रुप असेल तर यंदा कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र पहायला विसरू नका. Harvest Moon 2020: आज रात्री दिसणार ऑक्टोंबर महिन्यातील पहिला पूर्ण चंद्र, जाणून घ्या कुठे आणि कसा पहाल हार्वेस्ट मून?

यंदा 31ऑक्टोबरला चंद्र आभाळात संध्याकाळी 6.08 च्या सुमारास चंद्र उगवण्यास सुरूवात होणार आहे त्यामुळे या वेळेनंतर तुम्ही सहज तो पाहू शकता. त्यासाठी विशिष्ट यंत्राची गरज नाही. Water Found on Moon: NASA च्या SOFIA वेधशाळेने केला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा.

ब्लू मुन म्हणजे नेमकं काय?

  • NASA ने दिलेल्या माहितीनुसार, सामान्यतः एका महिन्यात एक पौर्णिमा आणि एक अमावस्या असते. पण ज्या महिन्यात 2 पौर्णिमा येतात त्याच्या दुसर्‍या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लू मुन असं म्हटलं जातं.
  • ब्लू मुन म्हणजे चंद्राचा रंग निळा होणं अस किंवा दिसणं असं तुम्हांला वाटत असेल तर तसे होणार नाही. जगभरात वाढतं प्रदुषण, ज्वालामुखी, वाईल्ड फायर यामुळे चंद्राच्या रंगामध्येही बदल होत आहेत.
  • यंदा 31 ऑक्टोबरचा चंद्र हा ब्लू मुन असला तरीही तो नेहमीप्रमाणे हलका पांढरा-ग्रे रंगातच दिसणार आहे.
  • सर्वसामान्यपणे ब्लू मुन ही घटना दर 2-3 वर्षांनी येऊ शकते.
  • ब्लू मूनचे जे फोटो निळ्या रंगामध्ये प्रसिद्ध केले जातात ते फोटोशॉप केलेले किंवा इफेक्ट्स वाढवुन शेअर केलेले असतात.

निरभ्र आभाळात तुम्ही सहज पौर्णिमेचा चंद्र पाहू शकता. यंदाची ही पौर्णिमा थोडी स्पेशल देखील आहे कारण ही कोजागिरी पौर्णिमा आहे. लक्ष्मीची कृपा रहावी यासाठी शरद ऋतूमधील ही कोजागिरी पौर्णिमा जागवली जाते. चंद्रप्रकाशात दूध ठेवून ते पिण्याची पद्धत आहे.